मोबाईल कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून ग्राहकांची लूट

योगेश बरवड
Saturday, 10 October 2020

पलीकडून बोलणाऱ्याने थोड्याच वेळात मोबाईलवर लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितली. लिंकवर क्लिक करताच पतीच्या खात्यातून एकूण ८० हजार रुपये इतत्र ट्रान्सफर झाले.

नागपूर ः मोबाइल कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याची थाप मारून ग्राहकांची लूट करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. शहरातील नव्या घटनांमध्ये दोघांना एकूण ३ लाखांचा चुना लावण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

चर्चा तर होणारच! रंगीत कापुस ठरणार गेम चेंजर...

गिट्टीखदान हद्दीत राहणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीने १९ जुलै रोजी त्याच्या पत्नीच्या मोबाईल क्रमांकावर ४४४ रुपयांचे रिचार्ज केले. पण, रिचार्जची प्रक्रिया यशस्वी होऊ शकली नाही. यामुळे पतीने गुगलवर कंपनीच्या कस्टमर केअरच्या क्रमांकाचा शोध घेतला. त्यावर संपर्क साधला असता पलीकडून बोलणाऱ्याने दूरध्वनी कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी केली.

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

सोबतच पैसे परत देण्याचा तयारी दाखवीत डेबीट कार्ड व पेटीएम नंबर विषयी विचारणा केली. पलीकडून बोलणाऱ्याने थोड्याच वेळात पतीच्या मोबाईलवर लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितली. लिंकवर क्लिक करताच पतीच्या खात्यातून एकूण ८० हजार रुपये इतत्र ट्रान्सफर झाले. पतीने गिट्टीखदान ठाणे गाठून तक्रार दिली. प्रकरणाची सत्यता पडताळून पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा नोंदवीत पुढील तपास सुरू केला आहे. 

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

दुसरे प्रकरण वाडी हद्दीत उघडकीस आले आहे. या प्रकरणातील तक्रारदार वाडीतील रहिवासी आहे. मे महिन्यात अनोळखी क्रमांकावरून त्याला फोन आला. पलीकडून बोलणाऱ्याने त्याची ओळख आयडिया कंपनीचा प्रतिनिधी असल्याची करून दिली. थ्रीजी सीम फोरजीमध्ये कनव्हर्ट करून देण्याची ग्वाही दिली. सोबतच तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून तो फॉरवर्ड करण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने ती प्रक्रिया पूर्ण केली. ६ मे रोजी अन्य मोबाईल क्रमांकावरून पुन्हा एसएमएस आला. इंग्रजीत ‘यस’ टाइप करून मॅसेज फॉरवर्ड केला.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

लागलीच संबंधित क्रमांकाचे सीम बंद झाले. त्यानंतर १२ मे रोजी तक्रारकर्त्याने एटीएम मशीनमधून खात्यातील बॅलेंस चेक केले. त्याच झिरो बॅलेंस दाखविण्यात आल्याने तक्रारकर्त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी लागलीच आयसीआयसीआय बँकेच्या हिंगणा शाखेत धाव घेत स्टेटमेंट मिळविले. त्यात ७ मे रोजी पहिले १ लाख, त्याच दिवशी ५८ हजार ३०३ आणि ११ मे रोजी ६० हजार ५ रुपये असे एकूण २ लाख १८ हजार ५१० रुपये विड्रॉल करण्यात आल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वाडी ठाणे गाठून तक्रार दिली. वाडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

(संपादन : प्रशांत राॅय)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mobile customers looted