esakal | नागपूरकर उकाड्याने घामाघूम झाले असताना पावसाने घेतली विश्रांती; आता याचा करावा लागणार सामना
sakal

बोलून बातमी शोधा

The monsoon journey will be prolonged

विदर्भात पुढील चोवीस तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. तीन महिने बरसल्यानंतर आता पावसाला परतीचे वेध लागले आहे. मात्र, हवामान खात्याने यावर्षी राज्यातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास पंधरा दिवसांनी लांबणार असल्याचे म्हटले आहे.

नागपूरकर उकाड्याने घामाघूम झाले असताना पावसाने घेतली विश्रांती; आता याचा करावा लागणार सामना

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ होऊन उकाडा वाढला आहे. ढगाळ वातावरण व उकाड्यामुळे नागपूरकर घामाघूम झाले आहेत. तसेच अस्वस्थताही वाढली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील द्रोणीय स्थितीमुळे विदर्भात पुढील चोवीस तासांत जोरदार पाऊसही अपेक्षित आहे.

गेल्या काही दिवसांपासून दररोज ढग दाटून येत आहेत. क्वचित हलक्याफुलक्या पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत. उन व ढगाळ वातावरणामुळे सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली असून, पारा ३५ अंशांवर गेला आहे. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढून उकाडा जाणवू लागला आहे. हवामान विभागाने दोन-तीन दिवस विदर्भ व मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा - सासऱ्याने जावयाची केली दहा लाखांची मदत; मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला कठोर निर्णय

विदर्भात पुढील चोवीस तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. तीन महिने बरसल्यानंतर आता पावसाला परतीचे वेध लागले आहे. मात्र, हवामान खात्याने यावर्षी राज्यातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास पंधरा दिवसांनी लांबणार असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याऐवजी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात मुक्काम ठोकून नंतरच तो परतीच्या प्रवासाला निघेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळी वातावरण पुढील आठवड्यापर्यंत कायम

राज्यात पावसाळी वातावरण पुढील आठवड्यापर्यंत कायम राहणार आहे. परतीच्या प्रवासाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजस्थानच्या दक्षिण भागातून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

कमी दाबाचा पट्टा सक्रिय

दरवर्षी साधारणपणे एक सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होते. मात्र, यावर्षी हवामान विभागाने परतीच्या प्रवासाची तारीख १७ सप्टेंबर दिलेली आहे. बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा प्रवास लांबण्याचे मुख्य कारण आहे. दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपासून कर्नाटकपर्यंतची द्रोणीय स्थिती आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीचाही प्रभाव दिसून येत आहे. याशिवाय चार-पाच दिवसानंतर याच भागात आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे