कपाशीच्या शेतात शेतकऱ्याला आली सडकी दुर्गंधी जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप; आढळला मृतदेह  

रुपेश खैरी 
Thursday, 29 October 2020

अद्याप त्याची ओळख पटली नाही. या व्यक्‍तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.

वर्धा : येथील वर्धा-हिंगणघाट मर्गावर सोनेगाव लगत एका शेतात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी (ता.28) सायंकाळच्या सुमारास उघड झाली. मृताचा चेहरा दगडाने ठेचल्याचे दिसत आहे. त्यामुळे अद्याप त्याची ओळख पटली नाही. या व्यक्‍तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.

हेही वाचा - प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले तेराव्याचे जेवण

सध्या शेतात कपाशीचे पीक आहे. झाडे चांगलीच वाढली आहे. सदर शेतकरी शेतात गेला असता तिथे त्याला सडकी दुर्गंधी आल्याने त्याने जाऊन पाहिले असता तिथे मृतदेह पडून दिसला. त्याने लगेच याची माहिती अल्लीपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली असता मृतकाशेजारी एक दगड दिसून आला. यामुळे दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ही घटना आजची नाही. याला 24 तासांपेक्षा अधिक कलावधी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मृतदेह कुजण्याच्या दिशेने आल्याने तसा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेची चमूही घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांकडून तपास सुरू झाला असून मृताची ओळच पटविण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नक्की वाचा - कोरोनाच्या संकटावर मात करत अमरावतीचे डॉक्टर घेताहेत महिन्याला तब्बल दहा लाख किलो चिकनचे उत्पादन

श्‍वान पथकाला पाचाराण

घटनेची माहिती होताच पोलिस प्रशासनाकडून श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. पथक येईपर्यंत काळोख झाल्याने श्‍वान कोणती दिशा दाखवितात याकडे अनेकांच्या नजरा होत्या. ही घटना येथेच घडली की विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह येथे आणून टाकला याचा खुलासा तपासाअंती होणार असून याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संपादन  - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mortal of a man found in cotton farm in wardha district