esakal | डोंगरगाव शिवारात दोन युवकाचे मृतदेह आढळले; अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

mortals of 2 men were found near Nagpur Ambhora road

मृतकाची ओळख पटावी म्हणून परिसरातील नागरिकांना विचारणा केली असता सुरगाव येथील कमलेश अंबादास ढेंगरे यांनी सांगितले की,हे मृतक दिघोरी नागपूरचे आहेत.म्हणून

डोंगरगाव शिवारात दोन युवकाचे मृतदेह आढळले; अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
विजयकुमार राऊत

कुही (जि. नागपूर): पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागपूर - आंभोरा मार्गावरील डोंगरगाव शिवारात आज सकाळी रस्त्याच्या कडेला दोन युवकांचे जखमी अवस्थेेेत असलेले मृतदेह आढळून आले.अशी माहिती परिसरतील नागरिकांनी पाचगाव पोलीस चौकीला दिली.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

मृतकाचे नाव कुणाल सुरेश चरडे (२९) रा.दिघोरी नागपूर व सुशिल सुनिल बावणे,रा.साईनगर, जयमाता शाळेच्या मागे,दिघोरी नागपूर असे आहेत.घटनेची माहिती मिळताच पाचगाव पोलीस चौकीचे पी.एस.आय.भारत थिटे शिपाई सचिन हटवार हे घटनास्थळी दाखल झाले.डोंगरगाव शिवारात कुही रस्त्यावर दोन बाजूला छिंन्न विच्छिन्न जखमी अवस्थेत दोन युवक पडलेले आढळून आले.

मृतकाची ओळख पटावी म्हणून परिसरातील नागरिकांना विचारणा केली असता सुरगाव येथील कमलेश अंबादास ढेंगरे यांनी सांगितले की,हे मृतक दिघोरी नागपूरचे आहेत.म्हणून त्यांनी मृतकाच्या नातेवाईकास संपर्क केला.मृतकाचे नातेवाईक घटनास्थळी दाखल होत मृतकाची ओळख पटवून दिले.तेव्हा दोन्ही मृतदेहाचा पंचनामा केला असता त्यांच्या शरीरावर डोक्यावर,पोटावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार केलेले दिसून आले.

हे वाचाच - सुशील-कुणालची ‘सुपारी किलींग’? नागपुरात संशयातून दुहेरी हत्याकांड; गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

तसेच रक्ताने माखलेला सिमेंट काँक्रीट चा पोल आढळून आला.या महितीवरुन असा निष्कर्ष काढण्यात आले की,या दोन्ही युवकाचा खून येथेच करण्यात आला.यावरून अज्ञात आरोपी विरोधात भादवि ३०२ नुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास कुही पोलीस करीत आहे.बातमी लिहिपर्यंत आरोपीचा पत्ता लागलेला नव्हता.परंतु लवकरच आरोपी पकडले जातील.असे कुही पोलिसांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top