बिल भरा अन्यथा वीज होणार खंडित; महावितरणचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

MSEB asking for bills to Offices in Nagpur
MSEB asking for bills to Offices in Nagpur

नागपूर ः वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणकडून सोमवारी सर्व क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले. त्यानुसार वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांकडील वीजपुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो.

कोरोना काळात थकबाकी असणाऱ्या ग्राहकांकडील वीजपुरठा खंडित न करण्याचा निर्णाय महावितरणने घेतला होता. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही वीजपुरवठा खंडित न करण्याचे निर्देश दिले होते. परिणामी ग्राहकांना बिलाचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यातून थकबाकीची रक्कम फुगत गेली. 

डिसेंबरअखेर राज्यातील ग्राहकांकडे एकूण ६३ हजार ७४० कोटींची थकबाकी आहे. कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ४९८ कोटी, वाणिज्यिक, घरगुती व औद्योगिक ग्राहकांकडे ८ हजार ४८५ कोटी व उच्चदाब ग्राहकांकडे २ हजार ४३५ कोटींची थकबाकी आहे. यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती चांगलीच बिकट झाली आहे.

मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात खाजगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रीतसर परवानगी घेऊन सप्टेंबर २०२० मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. महावितरणने मात्र नरमाईची भूमिका घेतली होती. आता मात्र थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अशक्य झाले आहे.

लागलीच थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेतही दिले आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com