हिस्स्याची बोलणी करण्यासाठी सायंकाळी मैदानात बोलावले आणि चाकूने कोली हत्या

दिलीप गजभिये
Thursday, 15 October 2020

तीन दिवसांपूर्वी अश्विनने शुभमच्या साथीदारास पैशाची मागणी करून चाकू दाखवून शुभम व त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. आश्विन आपला गेम करेल, अशी भीती दोघांना होती. अश्विनला हिस्सा म्हणून पैसे न देता त्याचा ‘गेम’ करायचा दोघांनी प्लान केला.

खापरखेडा (जि. नागपूर) : चनकापूर परिसरातील एका ग्राउंडमध्ये सराईत गुन्हेगाराची त्याच्याच सराईत गुन्हेगार ओळखीच्या मित्राने पैशाच्या मागणीवरून वारंवार ब्लॅक मेल करीत असल्याचा कारणावरून चाकूने गळा कापून निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता शिवरामनगर वॉर्ड क्रमांक दोन चनकापूर येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम पाटील आणि आश्विन ढोणे हे दोघेही खापरखेडा वॉर्ड नंबर चार येथे राहतात. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. आश्विन ढोणेवर खून, खुनाचा प्रयत्न, मारपीट, अवैध कट्टा बाळगणे, वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शुभम पाटील याच्यावरही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शुभम पाटील याने काहीतरी प्रकरण करून चार ते पाच लाख रुपये आणले असल्याची माहिती आश्विन ढोणेला मिळाली होती. तेव्हापासून आश्विन ढोणे याने शुभम आणि त्याचे साथीदार त्याला त्या पैशातील वाटणी म्हणून मागणी करू लागले. त्याला ‘ब्लॅक मेल’ करणे सुरू केले.

हेही वाचा - हॉटेल घेता का हॉटेल! झळकू लागले फलक

तीन दिवसांपूर्वी अश्विनने शुभमच्या साथीदारास पैशाची मागणी करून चाकू दाखवून शुभम व त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. आश्विन आपला गेम करेल, अशी भीती दोघांना होती. अश्विनला हिस्सा म्हणून पैसे न देता त्याचा ‘गेम’ करायचा दोघांनी प्लान केला. दोघांनी अश्विनला हिस्स्याची बोलणी करण्यासाठी शिवरामनगर येथील पडित शेतात असलेल्या रिकाम्या मैदानात बोलावले.

सायंकाळची अंधाराची वेळ असल्याने घटनास्थळावर आरोपी व तो याव्यतिरिक्त कुणीही नव्हते. तिघेही देशी दारू प्याले असावे, असा अंदाज घटनास्थळावर असलेल्या देशी दारूच्या बाटल्या आणि चाखण्यावरून लावण्यात आला. त्यानंतर नियोजितरित्या अश्विनला पकडून त्याच्या गळा कापण्यात आला. त्याच्या शरीरावरही चार चाकूने घाव मारण्यात आले.

ठळक बातमी - ‘ये लाईफ मैं डिझर्व्ह नही करता’, असे चिठ्ठीत लिहून पुण्यातील अभियंत्याची आत्महत्या

आश्विन मृत झाल्याची खात्री पटल्यावर आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून खून करण्यात आलेला चाकू, एक दुचाकी वाहन, दारूच्या बाटल्या जप्त केल्या. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले. आरोपीच्या शोधासाठी खापरखेडा पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टीम तयार करून शोध मोहीम सुरू केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder a Criminal stabbed to death in Sarai