नागपूर : सहायक आयुक्ता करवसुलीत नापास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

महापालिका स्थायी समिती बैठक आज पार पडली. या बैठकीत अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी कर वसुलीचा आढावा घेतला. अर्थसंकल्पात स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी मालमत्ता कराचे 443 कोटींचे लक्ष्य निर्धारित केले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांत 40 टक्‍के करवसुली झाली आहे. आतापर्यंत मनपाच्या तिजोरीत 171 कोटींच जमा झाले. स्थायी समितीने दिलेले 443 कोटींचे लक्ष्य गाठणे विभागाला शक्‍य नसल्याचे दिसून येत आहे. लक्ष्य गाठण्याची प्रत्येक झोनवर ही जबाबदारी देण्यात आली होती. आतापर्यंत 5.50 लाख डिमांड पाठविण्यात आल्या आहेत.

नागपूर : महापालिकेच्या उत्पन्नाचा कणा असलेल्या मालमत्ता कर वसुलीत दहाही झोनचे सहायक आयुक्त नापास झाले असून त्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. 10 जानेवारीपर्यंत केवळ 171 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आल्याने स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पाहाणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य पूर्ण करा अन्‌ कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी सहायक आयुक्तांना दिला.

महापालिका स्थायी समिती बैठक आज पार पडली. या बैठकीत अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी कर वसुलीचा आढावा घेतला. अर्थसंकल्पात स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी मालमत्ता कराचे 443 कोटींचे लक्ष्य निर्धारित केले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांत 40 टक्‍के करवसुली झाली आहे. आतापर्यंत मनपाच्या तिजोरीत 171 कोटींच जमा झाले. स्थायी समितीने दिलेले 443 कोटींचे लक्ष्य गाठणे विभागाला शक्‍य नसल्याचे दिसून येत आहे. लक्ष्य गाठण्याची प्रत्येक झोनवर ही जबाबदारी देण्यात आली होती. आतापर्यंत 5.50 लाख डिमांड पाठविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - अहो आश्‍चर्यम्‌ नवेगावमध्ये आढळले अल्बिनो सांबर
 
शहरात एकूण 7 लाख युनिट असून 6.13 लाख मालमत्ता आहेत. मागील वर्षी 208 कोटींची मालमत्ता करापोटी मिळाले होते. 31 मार्च येण्यास अजून अडीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे मालमत्ता कर वसुली 300 कोटींवर जाईल, अशी अपेक्षा पोहाणे यांनी व्यक्त केली.

जप्त 200 मालमत्ता मनपाच्या नावे करणार
गेल्या अनेक वर्षांपासून 514 कोटीची थकबाकी आहे. थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून 200 मालमत्ता महानगरपालिकेच्या नावाने होणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.

क्लिक करा - तमाशासम्राज्ञी विठाबाईंचे स्मारक अजुनही कागदावरच
 
थकबाकीदारांची संख्या व थकीत रक्कम

पाच लाखांपेक्षा अधिक थकीत असलेल्यांची संख्या : 472 (146 कोटी थकीत)
1 ते पाच लाख रुपयांपर्यंत थकीत असलेल्यांची संख्या : 1833 (35 कोटी थकीत)
50 हजार ते एक लाखांपर्यंत थकीत असलेल्यांची संख्या : 3500 (24 कोटी थकीत)
25 ते 50 हजार रुपयांपर्यंत थकीत असलेल्यांची संख्या ः 1258 (40 कोटी थकीत)
5 ते 25 हजार रुपयांपर्यंत थकीत असेलल्यांची संख्या : 1,30,671 (137 कोटी थकीत)
5 हजार रुपयांपेक्षा कमी थकीत असलेल्यांची संख्या 1,84,510 (42 कोटी थकीत)
एकूण थकबाकीदार : 3 लाख 33 हजार 87

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Assistant Commissioner unsuccessful in Tax Collection