हुडहुडी... हुडहुडी... हुडहुडी...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 December 2019

वातावरणाचा आता काहीही भरोसा राहिलेला नाही. उन्हाळ्यात पाऊस पडतो तर पावसाळा कोरडा जातो. शेवटी-शेवटी मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाने नुकसान होते. त्यामुळे नेमका कोणता ऋतू सुरू आहे, असा प्रश्‍न नागरिकांच्या मनात उपस्थित होतो. यावरून सोशल मीडियावर चांगले जोक्‍स व्हायरल होतात. दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून, आणखी दोन दिवस असेच वातावरण राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ""आला "हिवसाळा', स्वेटर जॅकेटसह रेनकोटा घाला'' असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

नागपूर : दिवसभर वाहणाऱ्या गार वाऱ्यानंतर सायंकाळी नागपूरकरांत हुडहुडी भरली. शनिवारी शहराच्या तापमानात साडेसात अंशांनी घसरण झाली. पारा 5.1 अंश सेल्सिअसपर्यत घसरला. 30 डिसेंबरनंतर वादळी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली असून, थंडी आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली आहे. पाऊस गायब होताच थंडीचा कडाका वाढला असून गेल्या चोवीस तासांत राज्यात सर्वाधिक थंडीची नोंद नागपुरात करण्यात आली आहे. 

दिवसभर गार वाऱ्यामुळे नागपूरकर स्वेटर, उणी कपड्यांत दिसून आले तर काही चौकांमध्ये शेकोटीचाही आधार नागरिकांनी घेतला. उत्तर भारतात सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे मध्य भारतात थंडीचा जोर वाढला आहे. थंडीचा प्रभाग विदर्भात सर्वाधिक दिसून आला. शुक्रवारी 12.6 पर्यंत खाली घसरलेल्या पाऱ्याचा आलेख आज 5.1 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला.डिसेंबरमध्ये नागपूर गारठण्याची गेल्या काही वर्षांत पडलेली प्रथा यंदाही कायम दिसून येत आहे.

हेही वाचा - तुम्ही सोशल मीडियाच्या आहारी गेले ना... मग हे वाचाच

मागील वर्षी 29 डिसेंबरला पारा 3.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. त्यापूर्वी 2014 मध्ये 29 डिसेंबरलाच 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. गोंदियात 5.2 अंश सेल्सिअसवर पारा होता. विदर्भातील दहा शहरांपैकी आठ शहरात पारा 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली होता. केवळ वाशीम व गडचिरोलीत अनुक्रमे 11.2 व 12 अंश सेल्सिअसवर पारा होता. 30 डिसेंबरनंतर दोन दिवस वादळी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानंतर आणखी थंडी वाढण्याची शक्‍यता वर्तविली आहे. 

विदर्भातील शहरात थंडी   
शहर किमान तापमान 
अकोला 8.7 
अमरावती 9.2 
बुलडाणा 9.5 
ब्रह्मपुरी 6.9 
चंद्रपूर 5.4 
गडचिरोली 12 
गोंदिया 5.2 
नागपूर 5.1 
वर्धा 7.5
वाशीम 11.2 
यवतमाळ

थंडीचा कडाका वाढणार

बुधवारच्या ढगाळ वातावरणानंतर पाऊस, गारठा, धुक्‍याची चादर अन्‌ शिमला व काश्‍मीरचा आल्हाददायक "फील' असाच काहीसा अनुभव गुरुवारी नागपूरकरांनी घेतला. शहरात पहाटेच्या सुमारास दमदार सरींनी हजेरी लावल्यानंतर दाट धुके पसरले. त्यामुळे वातावरण गारठले. विदर्भात पाऊस व ढगाळ वातावरण आणखी चोवीस तास कायम राहणार असून, त्यानंतर थंडीचा कडाका वाढणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur became cold