कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठच्या कुलगुरू पदाच्या शर्यतीत नागपूरचे चार उमेदवार, वाचा

सतीश दहाट
Friday, 18 September 2020

नागपूर विद्यापीठासह इतर राज्यातील विद्यापीठात परीक्षक, अधिकारी, विषयतज्ञ तसेच अभ्यासमंडळाचे ते सदस्य आहेत. यासह अखिल भारतीय फार्मसी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळीत आहेत. कामठी सारख्या ग्रामीण भागात असलेल्या महाविद्यालयास त्यांनी भारतातील अग्रगण्य महाविद्यालयाची श्रेणी मिळवून देण्यास यशस्वीपणे आपली भूमिका कुशलतेने पार पाडली आहे.

कामठी (जि. नागपूर) : पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील कुलगुरू डाॅ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ १७ जूनला संपला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमअंतर्गत नवीन कुलगुरू पदासाठी यथोचित व्यक्तीची शिफारस करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी देशभरातून तब्बल १६० पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केला होता. यापैकी २५ पात्र उमेदवारांची राज्यपाल तथा कुलपती यांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय शोध समितीने शिफारस केली आहे. यात नागपुरातील चार उमेदवारांचा समावेश आहे.

देशातील यंग इंडिया मिशनची संकल्पना लक्षात घेता तरुण आणि कुशल नेतृत्व म्हणून सर्वात कमी वयात आणि प्रथमच कुलगुरू पदाची मुलाखत देणारे डाॅ. मिलिंद उमेकर आहे. औषधीनिर्माणशास्त्र क्षेत्रातच नव्हे तर नागपूरकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. डाॅ. मिलिंद उमेकर यांनी शैक्षणिक प्रवासाला कामठी येथील फार्मसी महाविद्यालयात शिक्षक म्हणून सुरुवात केली होती.

क्लिक करा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

त्यांनी आपल्या २५ वर्षांच्या शैक्षणिक तसेच कुशल व्यवस्थापनाने महाविद्यालयात पदविका (डी.फार्म.) अभ्यासक्रमापासून पदवी (बी.फार्म.), पदव्युत्तर पदवी (एम.फार्म.) अभ्यासक्रम, मान्यताप्राप्त संशोधन केंद्रासह महाविद्यालयास संशोधन व विकासाच्या क्षेत्रात मध्य भारतात एक अग्रेसर म्हणून नावलौकिक मिळवून दिले.

अत्यंत अल्प कालावधीत महाविद्यालयास नॅक, एनबीए नामांकनासह पाच वर्षांपासून एनआयआरएफ रॅंकिंगमध्ये स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. डाॅ. उमेकर हे औषधीनिर्माणशस्त्र आचार्य पदवीसह द्वय आचार्य पदवीचे मानकरी आहेत.

असे का घडले? - तो रडकुंडीस येऊन म्हणतो, दादाऽऽ दादाऽऽ रिक्षात बसा ना; हृदय हेलावून टाकणारा संघर्ष

व्यवस्थापनात एमबीए, एफएएससी आणि एफआयपीएस धारक आहेत. त्यांना प्रशासकिय तसेच संशोधन अनुभवासह विविध  आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थी तसेच पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून अनुभव आहे. त्यांचे विविध पेटेंट प्रकाशित झाले असून, काही पेटेंट फाईल्ड आहेत.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक पेपर पब्लिकेशन तसेच पेपर्स त्यांनी प्रस्तूत केले आहेत. त्यांची पुस्तकेसुद्धा प्रकाशित झालेली असून, काही पुस्तके प्रकाशाधिन आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या परिषदा, सेमिनार, कार्यशाळा आदींचे व्यवस्थापन आणि आयोजन केले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक, सामाजिक तसेच व्यावसायीक अशा अनंत संस्थेचे सदस्य आहेत. विविध शासकीय व गैरशासकीय संस्थेच्या नियामक मंडळाचे पदसिद्ध सदस्य आहेत.

जाणून घ्या - 'ड्रग्स' म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे.. वाचा आणि आपल्या मुलांना असं ठेवा सुरक्षित

नागपूर विद्यापीठासह इतर राज्यातील विद्यापीठात परीक्षक, अधिकारी, विषयतज्ञ तसेच अभ्यासमंडळाचे ते सदस्य आहेत. यासह अखिल भारतीय फार्मसी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळीत आहेत. कामठी सारख्या ग्रामीण भागात असलेल्या महाविद्यालयास त्यांनी भारतातील अग्रगण्य महाविद्यालयाची श्रेणी मिळवून देण्यास यशस्वीपणे आपली भूमिका कुशलतेने पार पाडली आहे.

त्यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी निवड होणे ही खरचं नागपूरकरांसाठी गर्वाची बाब आहे. २६ व २७ सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यातून पाच जणांची निवड करण्यात येईल. या पाच जनांमधून कुलपती (राज्यपाल) एकाची कुलगुरू म्हणून निवड करतील.

हेही वाचा - चक्‍क देवीसमोर गुडघे टेकले होते कट्टर इस्लाम मानणारा बादशहा औरंगजेबाने! वाचा कुठे आहे मंदिर

हे आहेत उमेदवार

कामठी येथील श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. मिलिंद उमेकर यांच्यासह नागपूर विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू डाॅ. विनायक देशपांडे, विद्यापीठातील विविध विभागांचे विभाग प्रमुख असलेले डाॅ. प्रदीप कुंदाल व डाॅ. के. सी. देशमुख यांचा समावेश आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur four candidates in the race for the post of Vice-Chancellor