'मेडिकल'चे प्रशासन कोलमडले, प्रभारावरील अधिष्ठातांना आर्थिक व्यवहारात नाहीत स्वाक्षरीचे अधिकार

nagpur government medical college superintendent in charge not having rights for financial transaction
nagpur government medical college superintendent in charge not having rights for financial transaction

नागपूर : कोरोना आणीबाणीच्या काळात अचानक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज सादर केला. सध्या ते रजेवर आहेत. त्यांचा कार्यभार प्रभारावर आहे. प्रभारावरील अधिष्ठातांना आर्थिक व्यवहारात स्वाक्षरीचे अधिकार नाहीत. यामुळे मेडिकलमधील सारे प्रशासन कोलमडले आहे. 

मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा मागील पंधरा दिवसांपासून रजेवर आहेत. यामुळे येथील प्रशासन प्रभारावर आहे. विशेष असे की, स्वाक्षरीच होत नसल्याने प्रशासनही सुस्त बनले असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रभारी अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंग यांच्याकडे तात्पुरत्या स्वाक्षरीचे अधिकार देण्यासंदर्भातील आदेश अद्याप वैद्यकीय संचालक कार्यालयातून आले नाहीत. खरेदी स्थानिक खरेदी प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. प्रशासकीय कामाचा भार कसा सांभाळायचा? असा सवाल येथील प्रत्येक विभागासमोर उभा ठाकला आहे. अधिष्ठातांच्या स्वाक्षरीशिवाय येथे लोकल पर्चेस होत नाही. यामुळे रुग्णांसाठी आवश्यक खरेदी थांबली आहे. 

मुख्य प्रशासकीय अधिकारी पद रिक्त - 
मेडिकलमध्ये प्रशासकीय अधिकारी पदावर पदोन्नतीस पात्र असलेल्या कार्यालय अधीक्षकांना २०१५ पासून पदोन्नती नाकारली जात आहे. मेडिकलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम दोरवे निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागेवर नवीन मुख्य प्रशासकीय अधिकारी येतील अशी अपेक्षा होती. मात्र, हे पद अद्यापही रिक्त आहे. कायम अधिष्ठाता रजेवर आहेत. यामुळे स्वाक्षरीसाठी साऱ्या फाइल अधिष्ठातांच्या घरी पाठवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com