तुम्ही अजिबात घराबाहेर पडू नका, तुकाराम मुंढे यांनी आणले हे ऍप... यात आहेत या सुविधा...

Nagpur Municipal Corporation created Nagpur Live City App
Nagpur Municipal Corporation created Nagpur Live City App

नागपूर : नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी सुविधांमधील समस्या आणि तक्रारींसाठी आता मनपाच्या कोणत्याही कार्यालयात चकरा मारण्याची गरज पडणार नाही. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून "नागपूर लाइव्ह सिटी' ऍप तयार करण्यात आले आहेत. या ऍपच्या माध्यमातून कोणतीही तक्रार घरबसल्या दाखल करता येणार आहे. बुधवारपासून (ता. 8) ऍप नागरिकांच्या सेवेत दाखल झाले. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. 

नागरिकांच्या अनुकूलतेनुसार ऍप तयार करण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या तक्रारीची सद्य:स्थिती सिटीजन डॅशबोर्डवर पाहता येईल. ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, ते डाउनलोड करता येईल. अथवा https://www.nmcnagpur.gov.in/grievance या लिंकवरून पोर्टलला भेट देता येईल. ऍप वापरण्यास सोपे आहे. 

पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शाळा आणि शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, धोकादायक इमारती, रस्त्यावर पडलेली झाडे, मलवाहिनी, उद्यान अशा विविध तक्रारी मनपाच्या माध्यमातून सोडवून घेता येतील. संबंधित तक्रारकर्त्याला आता कोणत्याही कार्यालयात जायची किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची आवश्‍यकता नाही. दाखल केलेली तक्रार आपोआप संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग केली जाईल व विहित वेळेत सोडविली जाईल. ऍपवरून सदर तक्रार उघडणे, ती सोडविणे व त्याचे उत्तर नोंदविणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी राहील, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. 

ऍपमुळे होणारे फायदे

नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या कामामध्ये पारदर्शकता येईल. तक्रारीसंदर्भात करण्यात येणारी कार्यवाही आणि विहित वेळेत तक्रार सोडविण्याबाबत प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्‍चित होईल. विहित वेळेत कार्यवाही न झाल्यास संबंधित तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपोआप वळविली जाईल. तक्रारीसाठी विहित कालावधी किंवा तक्रार अन्य अधिकाऱ्यांकडे वळविण्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना कोणतेही स्वेच्छाधिकार नाहीत. त्यामुळे स्वत:ची तक्रार वेळेत सोडविणे बंधनकारक राहील. 

ऍपची वैशिष्ट्ये

तक्रार नोंदविण्यासाठी ऍप डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण आवश्‍यक माहिती भरून वन टाइम रजिस्ट्रेशन करणे आवश्‍यक आहे. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर कोणत्या नागरी सुविधांसंदर्भातील तक्रारीसाठी संबंधित व्यक्तीला साइन अप करावे लागेल. आपल्या तक्रारीची सद्यःस्थिती पाहता येईल. याशिवाय आपल्याद्वारे नोंदविण्यात आलेल्या सर्व तक्रारीही पाहता येतील. सोबतच आपल्या तक्रारीसंदर्भात अभिप्रायही नोंदविता येईल. ऍपमध्ये नोंद झालेल्या सर्व तक्रारी आपोआप मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या जातील. संबंधित अधिकाऱ्यांकडून विहित वेळेत तक्रार सोडविली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com