नागपूर : कोरोनामुक्तांचा टक्का पोहोचला ८४ वर; घट नजरेत भरणारी

In Nagpur the percentage of corona muktas reached Eight Four
In Nagpur the percentage of corona muktas reached Eight Four

नागपूर : नागपूर जिल्ह्यात रविवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत नजरेत भरणारी घट झाली आहे. दिवसभरात नागपुरातील सात प्रयोगशाळेत झालेल्या पाच हजार ८० चाचण्यांतून ६१७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मात्र, २४ तासांत २७ मृत्यू नोंदवले गेल्याने प्रशासनाने काहीशी चिंता व्यक्त केली आहे.

रविवारी जिल्ह्यात आढळलेल्या ६१७ बाधितांमध्ये नागपूर शहरातील विविध वस्त्यांमधील अवघ्या ५२८ रुग्णांचा समावेश आहे. तर नागपूर ग्रामीणमधील तेरा तालुक्यांमधील संख्या अवघी ८७ आहे. तर ३ रुग्ण जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे शहरातील बाधितांचा आकडा ६४ हजार ४९७ तर ग्रामीण भागातील आकडा १६ हजार ५२९ झाला आहे. जिल्हाबाहेरच्या बाधितांची संख्या ४३५ आहे. अशी एकूण ८१ हजार ४६१ बाधित नागपूर जिल्ह्यात आहेत.

यापैकी ६८ हजार ३७७ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यात शहरातील कोरोनामुक्तांची संख्या ५५ हजार ३५ आहे. तर ग्रामीण भागातून कोरोनावर विजय मिळवलेल्यांची संख्या १३ हजार ३४२ आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी १२.१४ नोंदवण्यात आली आहे. तर कोरोनामुक्तांचा टक्का ८४ वर पोहचला आहे.

जिल्ह्यात २४ तासांमध्ये २७ जण कोरोनामुळे दगावले आहेत. यातील शहरातील २० तर ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरच ३ मृत्यू झाले आहेत. यामुळे नागपूर जिल्ह्यातील कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या २६२३ झाली आहे. यात शहरातील १९१३ जण शहरातील तर ४५७ जण ग्रामीण भागातील आहेत. जिल्हाबाहेरच्या २५३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.मागील सहा महिन्यांत पाऊणेपाच लाख चाचण्या झाल्या आहेत.

रविवारीदेखील १२८८चाचण्या खासगी प्रयोगशाळेत झाल्या असून यापैकी १७२ जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले. मेडिकलमध्ये अवघे २ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर निरी प्रयोगशाळेतून १४, एम्समध्ये २२ तर माफसू प्रयोगशाळेतून ४८ जणांना बाधा झाली आहे. ३३१ जण रॅपिड चाचणीतून बाधित झाल्याचे निदान झाले.

गृहविलगीकरणात ६ हजार ७९०

जिह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख खाली येत आहे. मेयो,मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये दाखल कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सप्टेंबर महिन्यात साडेचार हजारांवर पोहचली होती. परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या ३ हजार ५४ वर आली आहे. सध्या यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर गृहविलगीकरणात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ७९० आहे. नागपुरात १० हजार ४६१ कोरोनाबाधित आहेत. यापैकी ७ हजार ७८ शहरातील तर ३ हजार १८३ ग्रामीण भागातील रुग्ण आहेत.

दुपटीपेक्षा जास्त कोरोनामुक्त

दिवसभरात ६१७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. तर १३७९ जणांनी कोरोनावर मात केली. रविवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे. शहरातील १३७९ पैकी १ हजार ११४ कोरोनामुक्त शहरातील आहेत तर २६५ जण गावखेड्यातील आहेत. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण ८४ टक्क्यावर पोहचले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com