उपराजधानीत बड्या क्रिकेट बुकीला अटक; तब्बल ४ लाख ८६ हजारांची रोख जप्त 

अनिल कांबळे 
Tuesday, 2 March 2021

मानवसेवानगर भागात रुपेश दामोदर परसोडकर व त्याचा भाऊ आशिष दामोदर परसोडकर (रा. मानवसेवानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे सट्टापट्टीची खायवडी करीत असल्याची माहिती उपायुक्त विनीता शाहू यांना मिळाली.

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्या बुकी राजेश प्रेमलाल बल्लारे याला पोलिस उपायुक्त विनीता शाहू यांच्या विशेष पथकाने सेमिनरी हिल्समधील मानवसेवानगर भागात छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ८६ हजारांची रोख रकमेसह ११ लाखांचा माल जप्त केला आहे. अशी माहिती उपायुक्त विनीता शाहू यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा - पत्नीवर हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न; घर नावे करून देण्याचा तगादा
  
मानवसेवानगर भागात रुपेश दामोदर परसोडकर व त्याचा भाऊ आशिष दामोदर परसोडकर (रा. मानवसेवानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे सट्टापट्टीची खायवडी करीत असल्याची माहिती उपायुक्त विनीता शाहू यांना मिळाली.

त्यांच्या विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप चंदन, हेडकॉन्स्टेबल आदित्य यादव, राजेश सोनवाने, अमितकुमार सिंग ,पराग फेबडे, आलिम खान व कल्याणी पराते यांनी मानवसेवानगरमध्ये छापा टाकला. पोलिसांनी आशिष व रुपेशला अटक केली. 

नक्की वाचा - मुलींची निर्वस्त्र पूजा प्रकरण : भोंदूबाबाकडे सापडले...

चौकशीदरम्यान राजेश हा सट्टापट्टीचा सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी राजेश याच्या घरी छापा टाकला. यादरम्यान राजेश हा क्रिकेट सामन्यावरही सट्ट्याची खायवडी करीत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडून रोख व कार जप्त केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur police caught bookie