विदेशी तरूणींकडून नागपुरात देहव्यापार; रॅकेट चालविणाऱ्या पती-पत्नीसह तिघांना अटक

अनिल कांबळे 
Tuesday, 19 January 2021

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय शास्त्री घोणमोडे (रा. मॉं ऊमिया कॉलनी, वाठोडा) आणि त्याची पत्नी वर्षा घाणमोडे तसेच त्यांची साथिदार रूपा विजय राठोड (मानव शक्तीनगर, खरबी) हे तिघेही सेक्स रॅकेट चालवितात.

नागपूर ः नागपुरात देहव्यापार मोठ्या प्रमाणात पसरला असून नागपुरात विदेश तरूणींनासुद्धा देहव्यापारासाठी आणल्या जात आहे. अनेक दलाल आंबटशौकिनांच्या मागणीवरून विदेशी तरूणींना कॉट्रक्टवर भारतात आणून नागपुरात पुरवित आहेत. गुन्हे शाखेने वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर छापा घालून दोन विदेशी तरूणीची सुटका केली आहे. रॅकेट चालविणाऱ्या पती-पत्नीसह तिघांना अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय शास्त्री घोणमोडे (रा. मॉं ऊमिया कॉलनी, वाठोडा) आणि त्याची पत्नी वर्षा घाणमोडे तसेच त्यांची साथिदार रूपा विजय राठोड (मानव शक्तीनगर, खरबी) हे तिघेही सेक्स रॅकेट चालवितात. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्या विदेशातील तरूणींनाही नागपुरातील आंबटशौकींनाना पुरवित होते. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच बांगलादेशवरून काही तरूणी देहव्यापारासाठी नागपुरात बोलावले असून त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करवून घेतल्या जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांना मिळाली. 

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

त्यांनी सामाजिक सुरक्षा विभाग पथकाला छापा मारण्याचे आदेश दिले. अभय, वर्षा आणि रूपा यांनी सुरू केलेल्या वाठोडा परिसरातील सेक्स रॅकेटवर पोलिसांना सोमवारी छापा घातला. या छाप्यात बांगलादेशी दोन तरूणींनी ताब्यात घेण्यात आले.तर पती-पत्नीसह रूपा राठोडला अटक करण्यात आली. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पीएसआय मंगला हरडे, अनिल अंबाडे, भूषण झाडे, अजय पौनिकर, मनिष रामटेके, सुजाता पाटील आणि प्रिती नेवारे यांनी केली.

बांगलादेशी तरूणीकडे मिळाले आधारकार्ड

देहव्यवसायासाठी भारतात आलेली तरूणी सलमान नावाच्या प्रियकरासोबत भारतात आली. ती मानेवाडातील एका प्रशस्त घरात प्रियकरासोबत भाड्याने राहते. ती रूपा आणि वर्षाच्या संपर्कात होती. तिच्याकडे नागपुरातील सदर भागातील रहिवाशी असल्याचे दाखवून चक्क आधारकार्ड मिळून आले. तिच्यासारख्या अनेक विदेशी तरूणी नागपुरात असून त्यांच्याकडेही बनावट दस्तावेज असण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा - प्रेमासमोर जन्मदात्याचा विसर! 'प्लीज पप्पा, तक्रार नका देऊ न' असं म्हणत चाकूहल्ला करणाऱ्या मुलाची घेतली बाजू

बांगलादेशी तरुणीची सुटका नागपूर, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी सायंकाळी वाठोडा येथील सदाशिव नगर मध्ये छापा टाकून सेक्स रॅकेट उघडकीस आणले. पोलिसांनी २५ वर्षीय बांगलादेशी तरुणीची सुटका करून, पती पत्नी आणि दलाल महिलेला अटक केली.अभय , त्याची पत्नी वर्षा आणि महिला दलाल रूपा , अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. उशिरा रात्री पर्यंत कारवाई सुरू असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Police Caught foreigners doing bad businesses