nagpur university exam app will download also in old version mobile
nagpur university exam app will download also in old version mobile

विद्यार्थ्यांनो आता चिंता नको, जुन्या मोबाईलमध्येही विद्यापीठाचे परीक्षा अ‌ॅप होणार डाउनलोड

नागपूर : अनेक मोबाईलमध्ये जुने ५.१ व्हर्जन असल्याने त्यात विद्यापीठाच्या परीक्षेचे अ‌ॅप डाउनलोड होत नसल्याचा तक्रारी समोर आल्या आहेत. विद्यापीठाने त्याची दखल घेत त्यात काही सुधारणा केल्या आहेत. आता ५.१ व्हर्जन असलेल्या मोबाईलमध्ये 'आरटीएमएनयू परीक्षा अ‌ॅप' डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली. 

विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांमध्ये सुमारे ७० हजार विद्यार्थी आहेत. त्यासाठी जवळपास ४ लाख ७० हजार नागरिकांनी हे ‌अ‌ॅप डाउनलोड केले आहे. त्यामुळे संकेतस्थळ आणि सर्व्हरवर ताण पडतो. यामुळे विद्यार्थी अ‍ॅपचा वापर करताना बऱ्याच तक्रारी येत होत्या. यापैकी मुख्य तक्रार म्हणजे ५.१ व्हर्जन असलेल्या अ‌ॅन्ड्राईड मोबाईलवर हे अ‌ॅप डाउनलोड करता येत नसल्याचे दिसून येत होते. यावर शक्कल म्हणून अनेक विद्यार्थी आपल्या नातेवाइकांचा मोबाईल वापरत आहेत.

सुरुवातीला स्वतःच्या मोबाईलवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार असल्याचे सांगण्यात आल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले. नंतर नव्याने परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना मोबाईल बदलण्याची मुभा देण्यात आली. मात्र, ५.१ व्हर्जन असलेल्या अ‌ॅन्ड्राईड मोबाईलवर हे अ‌ॅप डाउनलोड करता येत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार कायम होती. त्यामुळे विद्यापीठाने यावर उपाय शोधून ५.१ व्हर्जन असलेल्या ‌अ‌ॅन्ड्राईड मोबाईलवर हे अ‌ॅप डाउनलोड करणे शक्य केले आहे. आता या मोबाईलवरही विद्यार्थी 'आरटीएमएनन्यू परीक्षा' अ‌ॅप डाउनलोड करू शकतील. यामुळे विद्यापीठाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी कमी होणार आहेत. 

बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ५.१ व्हर्जन असलेले जुने मोबाईल असल्याने त्यात विद्यापीठाचे 'आरटीएमएनन्यू परीक्षा' अ‌ॅप डाउनलोड होत नसल्याचा तक्रारी समोर होत्या. मात्र, आता या समस्येचे निराकरण करण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com