गर्दी टाळण्यासाठी नागपुरातील हे मार्केट करण्यात आले अनिश्‍चित काळासाठी बंद...

vegetable market
vegetable market

नगापूर : शहरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्या चौदावर पोहोचल्याने महापालिकेने आता गर्दी होणारे मोठे बाजारही बंद करण्याचा निर्णय घेतला. शहरातील सर्व भाजीविक्रेते गर्दी करीत असल्याने कॉटन मार्केटही बंद करण्यात आले. कॉटन मार्केट कधी उघडणार? याबाबत कुठलेही स्पष्ट नसल्याने अनिश्‍चित काळासाठी बंद केल्याचे समजण्यात येत आहे. 

शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या आलेखाने प्रशासनालाही घोर लावला आहे. संचारबंदीनंतरही अत्यावश्‍यक वस्तू खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत आहेत. त्यात शहराच्या विविध भागातील भाजी विक्रेते कॉटन मार्केट येथील मुख्य बाजारात भाजी खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. शहरात आतापर्यंत 14 रुग्ण असून त्यातील चार रुग्णांना घरी पाठविण्यात आल्याचे आज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करीत आयुक्तांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत नसल्याची खंतही सोशल मिडियाद्वारे संवाद साधताना व्यक्त केली.

वाढत्या रुग्णांमुळे कडक निर्बंध
नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. या पार्श्‍वभूमीवर आज त्यांनी कॉटन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला. अत्यावश्‍यक सेवा सुरू असल्याने कॉटन मार्केटमध्ये दररोज भाजीपाल घेऊन ट्रक येत आहेत. भाजीपाल्याशिवाय फळांचेही ट्रक येत असून आता हे ट्रक शहराच्या विविध भागात पाठविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमुद केले. या ट्रकमधूनच किरकोळ भाजी विक्रेत्यांना भाजीपाला खरेदी करून नागरिकांपर्यंत पोहोचवा लागणार आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करा : आयुक्त 
प्रशासन वारंवार बजावित असतानाही नागरिक विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. बर्डी, कॉटन मार्केट अशा ठिकाणी गर्दी करीत आहेत. मात्र, नागरिकांनी आता ऐकले नाही तर हा विषाणू समाजात मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सर्व सुविधा घरपोच मिळण्याची व्यवस्था मनपा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहावे. कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com