जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश धाब्यावर, चार महिने उलटूनही कर्मचारी कार्यमुक्त नाहीच

नीलेश डोये
Sunday, 22 November 2020

बदली प्रक्रिया होऊन जवळपास एका महिन्याहून अधिकचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्यापपर्यंत बदली झालेल्यांना त्यांच्या विभागप्रमुखांनी कार्यमुक्त केले नाही. सीईओंनी बदली प्रक्रिया पार पडताच एक पत्र काढून बदली झालेल्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले. परंतु, सीईओंच्या या निर्देशाला विभागप्रमुखांनी केराची टोपलीच दाखविल्याचे पाहायला मिळते आहे.

नागपूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेशदेखील देण्यात आले. मात्र, मागील चार महिन्यांपासून विभागप्रमुख त्यांना कार्यमुक्त करीत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात ही संख्या सर्वाधिक २५ च्या घरात आहे, तर विविध पंचायत समिती कार्यालयातही असे कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. 

हेही वाचा - कापसाच्या डिजिटल नोंदणीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय थांबणार; राजुरा येथे सीसीआय कापूस...

बदली प्रक्रिया होऊन जवळपास एका महिन्याहून अधिकचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्यापपर्यंत बदली झालेल्यांना त्यांच्या विभागप्रमुखांनी कार्यमुक्त केले नाही. सीईओंनी बदली प्रक्रिया पार पडताच एक पत्र काढून बदली झालेल्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले. परंतु, सीईओंच्या या निर्देशाला विभागप्रमुखांनी केराची टोपलीच दाखविल्याचे पाहायला मिळते आहे.

हेही वाचा - आता मागेल त्याला काम, सुटणार रोजगाराचा मोठा प्रश्न

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी मे महिन्यात जवळपास ३० टक्के बदल्या करण्यात येतात. मात्र, यंदा कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुभार्वामुळे २०२०-२१ या वित्तीय वर्षात राज्याची कर व करेत्तर उत्पन्नातील अपेक्षित महसुली घट झाली. तसेच त्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे वित्त विभागाने विविध उपाययोजना करून बदली प्रक्रियेवर ४ मे नुसार निर्बंध घातले होते. मात्र, शासनस्तरावर लोकप्रतिनिधी व कर्मचारी संघटना यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर सरकारला बदल्या करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानुसार जिल्हा परिषदेने मुख्यालय तसेच पंचायत समितीस्तरावरील जवळपास सहाशेंवर कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया राबविली. ही बदली प्रक्रिया आटोपताच सीईओ योगेश कुंभेजकर यांनी एक पत्र काढून बदली झालेल्यांना त्वरीत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्तीचे आदेश दिलेत. सोबतच बदली झालेल्यांचे आता बदलीपूर्वीच्या ठिकाणावरून वेतन देय करू नयेत, असेही स्पष्टपणे विभागप्रमुखांना बजाविलेत. तरीही हे कर्मचारी मुख्यालय व पंचायत समिती स्तरावर ठाण मांडून असल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur zp employees not joined the duty after transfer