कोरोनाचा महाविस्फोट!  नागपुरात गेल्या २४ तासात तब्बल ७२०१ बाधित, दर दोन तासाला ५ मृत्यू 

६३ बाधितांचे बळी लक्षात घेत दर दोन तांसामध्ये ५ जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. विशेष अससेकी, जिल्ह्यात आज सर्वाधिक २६ हजारापेंक्षा अधिक चाचण्या झाल्या आहेत.
६३ बाधितांचे बळी लक्षात घेत दर दोन तांसामध्ये ५ जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. विशेष अससेकी, जिल्ह्यात आज सर्वाधिक २६ हजारापेंक्षा अधिक चाचण्या झाल्या आहेत.

नागपूर ः उपराजधानीसह ग्रामीण भागात कोरोनाचा महाउद्रेक सुरु आहे. दिवसाआड कोरोनाबाधितांचा नवीन रेकॉर्ड तयार होत आहे. यामुळे खाटांची संख्याअपुरी पडत आहे. मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालयांत खाटाच शिल्लक नाहीत. यामुळे नागपुरातील रुग्णांना अमरावतीला हलवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. कोरोनाचा धोका अधिक गहरा होत आहे. रविवारी आढळून आलेल्या ७ हजार २०१ बाधितांची संख्या लक्षात घेता दर तासाला ३०० जणांना कोरोनाची बाधा होत आहे. तर ६३ बाधितांचे बळी लक्षात घेत दर दोन तांसामध्ये ५ जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. विशेष अससेकी, जिल्ह्यात आज सर्वाधिक २६ हजारापेंक्षा अधिक चाचण्या झाल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यात यापूर्वी ९ एप्रिलला उच्चांकी ६ हजार ४८९ बाधितांची नोंद झाली. आता त्या आकडेवारीचाही रेकॉर्ड अवघ्या दोन दिवसानंतर मोडित निघाला. रविवारला आजवरची सर्वात उच्चांकी ७ हजार २०१ बाधितांची नोंद झाल्याने आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २ लाख ७८ हजार ५५६ वर पोहचली आहे. तर शहरातील ३६ आणि ग्रामीणचे २०, जिल्ह्याबाहेरील ७ अशा ६३ जणांचा कोरोनाने बळी घेतल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ५ हजार ७६९ झाली आहे. 

कोरोनामुळे जिल्ह्यातील परिस्थितीत आता संपूर्णत: हाताबाहेर गेली आहे. कोरोना प्रकोपापुढे आता प्रशासनही हतलब झाले. परंतु त्यानंतरही हा प्रकोप सातत्याने वाढतच आहे. रुग्णांना तासन तास प्रतीक्षा केल्यानंतरही खाट मिळेल याची शाश्र्वती राहीली नाही. आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाचाही तुटवडा असल्याने व्यवस्था असतानाही दुसरीकडे तात्पुरते रुग्णालय उभारणे शक्य होत नाही. रविवारी जिल्ह्यात विक्रमी २६ हजार ००७ इतक्या चाचण्या करण्यात आल्यात. यात २७.६९ टक्के म्हणजेच तब्बल ७ हजार २०१ नवे बाधित आढळून आलेत. यामध्ये शहरातील ४ हजार ६४१ आणि ग्रामीणचे २ हजार ५५३ व जिल्ह्याबाहेरी ७ रुग्णांचा समावेश आहे.

४९ हजार ४९ बाधित गृहविलगीकरणात

शहरात ३६ हजार ४८५ तर ग्रामीण १८ हजार ९८९ असे एकूण जिल्ह्यात ५५ हजार ४७४ सक्रीय कोरोनाबाधित उपचाराधिन आहेत. त्यातील ४९ हजार ४९ रुग्ण गृह विलगिकरणात उपचार घेत आहेत. तर गंभीर गटातील ६ हजार ४२५ रुग्णांवर मेयो, मेडिकलसह विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यातुन आज ३ हजार २४० जण ठणठणीत होऊन घरी परतल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या २ लाख १७ हजार ३१३ झाली आहे. रुग्ण बरा होण्याचे प्रमाण घटून ७८.०१ टक्क्यांवर आले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com