‘श्‍श्‍शु...! प्रत्येक महिन्याच्या ३ तारखेला 'नो हॉर्न प्लीज’; जनआक्रोशतर्फे नागपूरकरांना आवाहन

केतन पळसकर 
Wednesday, 3 March 2021

स्थानिक प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने संस्थेतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने आज हॉर्न न वाजविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

नागपूर : वाहन चालकांतर्फे सर्रास हॉर्नचा उपयोग केल्या जात असल्याने ध्वनिप्रदूषणात वाढ होते. याबद्दल जनजागृती करण्यासाठी जनआक्रोश संस्थेने प्रत्येक महिन्याच्या तीन तारखेला 'नो हॉर्न' दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने संस्थेतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने आज हॉर्न न वाजविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - गडकिल्ले आणि हेरिटेजसाठी तरुणाचे सायकलने भारत भ्रमण; १५ राज्यातून करणार ११ हजार किमीचा प्रवास

जनआक्रोश संस्थेतर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी, १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हॉर्नपासून होणारे दुष्परिणाम लक्षात घेता संस्थेतर्फे दर महिन्यात ‘नो हॉर्न डे’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हा उपक्रम आता व्यापक स्वरूप घेतो आहे. या करिता संस्थेला पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनदेखील लाभते आहे. या विषयावर जनजागृती व्हावी या उद्देशाने ‘रस्ता सुरक्षा व जनजागृती’ या विषयावर पथनाट्य स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, एकूण ६ गटांनी सहभाग घेतला. हॉर्नमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, रुग्ण यांना त्रास होतो.

हेही वाचा - स्मार्ट अँड हायटेक पोलिसांना लावता आला नाही नागपुरातील १९ हत्याकांडाचा छडा

स्लो पॉयझनींग
वाहनांचे हॉर्न स्लो पॉयझनींग सारखे काम करतात. मात्र, याचा परिणाम हा दूरगामी असतो. शहरातील हॉर्नची डेसिबल लेव्हल मोजल्या जात नाही. तसेच, रस्ता सुरक्षा सप्ताह सारखे उपक्रम केवळ एक दिवस आयोजित करून उपयोग नाही. ही रोजची समस्या आहे. यासाठी लोकांनी रोज जागरूक राहत गरजेपेक्षा जास्त हॉर्न वाजवायला नको.
-अशोक करंदीकर,
 उपाध्यक्ष, जनआक्रोश. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No horn Day in Nagpur on on 3rd day of every month