No network coverage of internet because of everyone's work from home
No network coverage of internet because of everyone's work from home

नेटवर्कची "रेंजच नाही, कसे करावे काम

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावावर निर्बंध लावण्यासाठी टाळेबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मोबाईल, इंटरनेट, वाय-फाय, ब्रॉडबॅंड नेटवर्कवरही परिणाम होऊ लागला आहे. त्याचा फटका "वर्क फ्रॉम होम'ला बसू लागला आहे. संथगतीने सुरू असलेल्या नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप्स आणि इंटरनेटमध्ये अडथळे येत आहेत. बऱ्याच भागात नागरिकांना रेंज मिळत नसल्याने आता नेटवर्कदेखील लॉकडाउन झाल्याचे बोलले जात आहे. 

मोबाईल सेवा देणाऱ्या खासगी व सरकारी कंपन्यांचे नेटवर्क तांत्रिक अडचणीमुळे बंद पडत आहे. यामुळे कॉल ड्रॉप्स आणि कित्येक तास रेंज गायब होण्याच्या समस्येत दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. इंटरनेटवर त्याचा परिणाम होत आहे. वर्क फ्रॉम होमच्या स्थितीत नेटवर्कचा अडथळा कळीचा मुद्दा झाला आहे. टाळेबंदी लागू होऊन दोन महिन्यांचा कालावधी पार पाडला आहे. नेटवर्क वापरणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने रेंज गायब होण्याचे प्रमाण वाढले. मात्र, या समस्येत सुधारणा होण्याऐवजी वाढ होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. घरात ब्रॉडबॅंड आणि वायफाय कनेक्‍शन देणाऱ्या खासगी कंपन्यांच्या सेवाही विस्कळीत झाल्या आहेत. त्या दुरुस्तीचे काम थोड्याफार प्रमाणात सुरू आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अनेकांच्या घरातील वाय-फाय सुविधाही बंद पडत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान, रिचार्जमध्ये सूट मिळत नसताना नेटवर्कअभावी डेटाची मुदतही संपत आहे. त्यामुळे ग्राहकांना दुहेरी फटका बसू लागला आहे. एकाच वेळी वापर वाढल्यामुळे अडचणी येत आहेत. त्या सोडविण्यासाठी हवे तसे प्रयत्न कंपन्यांकडून होत नसल्याचेही उघड झाले आहे. 
खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. यामुळे बहुतांश कर्मचारी मोबाईल, इंटरनेट डोंगलद्वारे घरूनच काम करीत आहेत. सातत्याने नेटवर्क गायब होत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे. तसेच कार्यालयीन कॉन्फरन्स कॉलद्वारे होत आहेत. त्यातही कनेक्‍टिव्हिटी मिळत नसल्याचे तुषार हरणे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com