esakal | वीस दिवसांत सुपरच्या हृदयशल्यक्रिया विभागात एकही शस्त्रक्रिया नाही; चालतोय खुर्चीचा खेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Not had any surgery for twenty days in Super hospital

अडीच वर्षांनंतर डॉ. दास सुपर स्पेशालिटीत रुजू झाले. मात्र, २० दिवस पूर्ण होत असतानाही या विभागात एकाही हृदयावर अद्याप सुपरच्या हृदयशल्यक्रिया विभागात एकही शस्त्रक्रिया झाली नाही. यासंदर्भात सुपर प्रशासनाशी संपर्क साधला असता तांत्रिक कारणामुळे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही, असे सांगितले.

वीस दिवसांत सुपरच्या हृदयशल्यक्रिया विभागात एकही शस्त्रक्रिया नाही; चालतोय खुर्चीचा खेळ

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : सुपर स्पेशालिटीतील हृदयशल्य चिकित्सक सहयोगी प्राध्यापक डॉ. सतीश दास तीन ऑक्टोबरला रुजू झाले. मात्र, त्या दिवसापासून एकाही व्यक्तीच्या हृदयावर सुपरमध्ये शस्त्रक्रिया झाली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खुर्चीच्या खेळात येथील शस्त्रक्रिया थांबल्याची चर्चा येथे आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे तत्कालीन सचिव संजय देशमुख यांच्या कार्यकाळात मेडिकल-सुपरमधील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यात नागपूरच्या मेडिकल, मेयोतील डॉक्टरांची नावे होती. डॉ. दास यांचेही नाव त्यामध्ये होते. त्यावेळी डॉ. अभिमन्यू निसवाडे मेडिकलचे अधिष्ठाता होता. या प्रकरणात डॉ. दास यांची बदली कोल्हापुरात झाली. मात्र, ते तेथे रुजू झाले नाही.

जाणून घ्या - सर्तक रहा, आणखी पाऊस येणार म्हणजे येणार!

दरम्यान, डॉ. निसवाडे यांनी सुपरमधील हृदय शल्यक्रिया विभागातील डीएम अभ्यासक्रमाला फटका बसू नये म्हणून तत्काळ डॉ. निकुंज पवार यांची नियुक्ती केली. यानंतर या विभागात बऱ्यापैकी संगीत खुर्चीचा खेळ रंगला होता. डॉ. दास यांनी सुपरच्या समोरच समांतर बाह्यरुग्ण विभाग थाटला होता.

अडीच वर्षांनंतर डॉ. दास सुपर स्पेशालिटीत रुजू झाले. मात्र, २० दिवस पूर्ण होत असतानाही या विभागात एकाही हृदयावर अद्याप सुपरच्या हृदयशल्यक्रिया विभागात एकही शस्त्रक्रिया झाली नाही. यासंदर्भात सुपर प्रशासनाशी संपर्क साधला असता तांत्रिक कारणामुळे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही, असे सांगितले.

प्रतीक्षा यादी वाढणार

महात्मा फुले जीवनदायी योजनांसह इतर शासकीय योजनांमधून येथे गरिबांच्या हृदयावर शस्त्रक्रिया होतात. मात्र, २० दिवसांपासून सुपरच्या हृदय शल्यक्रिया विभागात एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. यामुळे येथील डॉक्टर, परिचारिकांसह इतर मनुष्यबळाच्या कामाचे ऑडिट व्हावे, अशी मागणी समता सैनिक दलातर्फे करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा - अर्ध्यारात्री बोलावले तरी यावेच लागेल!, श्रीमुखात लगावली

लवकरच सुरू होतील शस्त्रक्रिया
डॉ. दास सुपरमध्ये रुजू झाले आहेत. यांची बदली झाली होती. हृदय शल्यचिकित्सक म्हणून सुपरमध्ये सेवा देताना डॉ. दास यांचे मोलाचे योगदान होते. लवकरच शस्त्रक्रिया सुरू होतील.
- डॉ. मिलिंद फुलपाटील,
विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे

go to top