
नागपूर : वाढते मृत्यू आणि बाधितांची संख्येमुळेच सर्वच चिंतेत सापडलेले आहेत. रस्त्यांवर वाढणारी गर्दी, सुरक्षित वावरचा उडालेला फज्जा, हे सर्व दृश्य चिंताजनक आहेत. यामुळे संसर्ग कमी न होता वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच आता टाळेबंदीला विरोध करणाऱ्या व्यापारी संघटना व व्यापारीच टाळेबंदीसाठी सरसावल्याची माहिती पुढे आली आहे. अनेक संघटनांनी स्वयंघोषित बाजार बंदची घोषणा केली आहे. यामुळे इतरही व्यापारी संघटनांमध्येही बंद बाबत सकारात्मक चर्चा होत असल्याचे बोलले जात आहे.
टाळेबंदीचा कालावधी दोन आठवडे अथवा एका आठवड्याचा करावा यावर चिंतन केले जात आहे. सम-विषमचा नियम रद्द करण्याच्या मागणीसह चाचणीलाही विरोध करणारे व्यापारी आता टाळेबंदीसाठी पुढे सरसावले आहेत. अनलॉक-४मध्ये अनेक निर्बंध अधिक शिथिल झाल्याने सर्वत्रच गर्दी वाढली आहे. त्यातच महापालिकेने आता दुकानांसाठी असलेला सम-विषम तारखांचा नियमही रद्द केल्याने सर्वच प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने नियमित सुरू झाली आहेत.
दरम्यान, सम-विषमच्या नियमांना विरोध करणारे व्यापारी व त्यांच्याकडील कर्मचारीच आता करोनाबाधित होऊ लागले आहेत. व्यापारीही आता अधिक जोखीम उचलण्यास तयार नसल्याची माहिती पुढे आली आहे.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांचे याबाबत मत जाणून घेणे सुरू केले आहे. मात्र, टाळेबंदीबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. कापड व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अजय मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आमच्या संघटनेने स्वयंस्फूर्तीने १० ते १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एनव्हीसीसीला त्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.
तसेच एनव्हीसीतर्फे याबाबत जो काही निर्णय घेण्यात येईल त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यात येईल.'कळमना ग्रेन मार्केट, फ्रुट मार्केट आठवड्यातून तीन दिवस बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, टाळेबंदीबाबत संघटनांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे पुढील दोन दिवसातच टाळेबंदीबाबत स्पष्टता होईल अशी माहिती पुढे आली आहे. इतवारी किराणा मर्चंटस असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह म्हणाले प्रशासनाने संपूर्ण नागपूर बंद करून संसर्गाची श्रृंखला तोडावी त्यात आमचा सहभाग राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.