
सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत बाबर म्हणाले, निर्णयामुळे राज्यातील खेळाडू खुश असून, भविष्यात ते टेनिसबॉल क्रिकेट केवळ मनोरंजनसाठी खेळणार नसून याकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहणार आहेत. शिवाय या खेळाची क्रेझही वाढणार असल्याचे ते म्हणाले.
नागपूर : केंद्र सरकारने टेनिसबॉल क्रिकेटचा क्रीडा आरक्षणामध्ये (स्पोर्ट्स कोटा) समावेश केल्याने आता या खेळाडूंनाही सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत. महाराष्ट्र टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. महंमद बाबर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
हेही वाचा - मामा-भाचाच्या वयात फक्त चार वर्षांचा फरक; मित्रांसारखे राहत असताना विसरले नात्याचा...
केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने नुकताच यासंदर्भातील आदेश काढला. गेल्या सप्टेंबरमध्ये क्रीडा विभागाने केंद्रीय मंत्रालयाला प्रस्ताव पाठविला होता. सरकारने त्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेत प्राविण्यप्राप्त खेळाडूंना सरकारी विभागांमध्ये 'क' गटाच्या पदभरतीसाठी पात्र ठरविले आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील शेकडो युवा खेळाडूंना होणार आहे.
सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत बाबर म्हणाले, निर्णयामुळे राज्यातील खेळाडू खुश असून, भविष्यात ते टेनिसबॉल क्रिकेट केवळ मनोरंजनसाठी खेळणार नसून याकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहणार आहेत. शिवाय या खेळाची क्रेझही वाढणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - चला, शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करूया; शेतकरी आंदोलनाचे नेते अमर हबीब यांचं आवाहन
दरम्यान, नऊ फेब्रुवारीपासून आग्रा येथे होणाऱ्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला. शेख महंमद हारूनच्या नेतृत्वातील महाराष्ट्र संघात मनोज मेहर, सोनू गुप्ता (दोघेही नागपूर), राहुल नाईक, हर्षद मेहर, जागरूक धडू, यादेश वर्टी, ऋषी शिंदे, यश चौहान, धीरज शिंदे, स्वरूप पाटील, सोनल पाटील, जया पटेलचा समावेश आहे. पत्रपरिषदेला संघटनेचे अध्यक्ष एस. फारुकी, उपाध्यक्ष डॉ. बाबूलाल धोत्रे, सहसचिव जगदिश गणभोज, निखिल राऊत उपस्थित होते.
संपादन - अथर्व महांकाळ