कोरोना ब्रेकिंग : नागपूरची अकोल्याच्या दिशेने वाटचाल; बाधित 697* 

The number of corona patient in Nagpur is close to seven hundred
The number of corona patient in Nagpur is close to seven hundred
Updated on

नागपूर : शुक्रवारी उपराजधानीत कोरोनाबाधितांचा उद्रेक झाला होता. दुसऱ्या दिवशीही हीच शक्‍यता होती. मात्र, दिवसभरात कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण आढळून आले. रविवारी त्यापेक्षा अर्धे म्हणजे पाच रुग्ण आढळून आले. यामुळे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा 697 वर पोहोचला आहे. सातवा शतक पूर्ण करण्याला आजचा दिवस पुरा आहे. दुसरीकडे एम्स, मेडिकल आणि मेयोतून शनिवारी 24 जणांना कोरोनामुक्त घोषित करीत त्यांना सुटी देण्यात आली. 

उपराजधानीत चार दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. अवघ्या चार दिवसांत बाधितांची संख्या शंभरवर पोहोचली आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांपैकी तीन रुग्ण गांधीबागमधील आहेत. त्यांना सिम्बॉयसीस कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले होते. तर एक रुग्ण लष्करीबाग व एक जाफरनगर येथील रहिवासी आहे. रुग्णांची वाढणारी आकडेवारी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.

शुक्रवारी आढळलेल्या छप्पन्न रुग्णांनंतर नवीन बाधितांची संख्या केवळ नऊ ने वाढली. यामुळे अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शनिवारी आढळून आलेल्या बाधितांमध्ये नागपूरच्या चौदा मिलमधील 2 रुग्ण, सिमेनरी हिल्समधील 1, सिंधी रेल्वे येथील (वर्धा) 1, अमरावती येथील 3, सदरमधील 1 , जुनी मंगळवारी परिसरातील 1 रुग्ण आढळला आहे. यांची सर्वांची चाचणी नागपुरातील प्रयोगशाळांमध्ये झाली. तसेच ते सर्व सिम्बॉसिस, पाचपावली विलगीकरण केंद्रात होते. नवीन रुग्ण पकडून शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या थेट 697 वर पोहोचली आहे. नागपुरातील बाधितांची संख्या सातशेच्या जवळपास आली आली. विदर्भात अकोला टॉपवर आहे. त्यापाठोपाठ आता नागपूर आहे. 

451 कोरोनामुक्त

शनिवारी आढळलेल्या बाधितांपेक्षा दुप्पटीने कोरोनाच्या बाधेतून मुक्त झाले. दिवसभरात 13 दिवसांच्या बाळासह 24 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे मेयो, मेडिकल आणि एम्समधून त्यांना सुटी मिळाली आहे. त्यानुसार मेयोतून 15, एम्समधून 7 आणि मेडिकलमधून 2 अशा एकूण 22 जणांना कोरोनामुक्त घोषित केल्याने नागपुरात आतापर्यंत 451 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1500 जण उपराजधानीतील विविध विलगीकरण केंद्रात आहेत. शहरातील गृह विलगीकरणात 387 जण आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. 

दीड वर्षाच्या चिमुकल्यासह 'सारी'चे दोन बळी

कोरोनाच्या तुलनेत उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत "सारी'चे मृत्यू वाढत आहेत. शनिवारी (ता. 6) मेडिकलमध्ये अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्यासह सारीच्या दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. दगावलेल्या रुग्णामध्ये 1 वर्ष 7 महिन्याचा बिडगावच्या मुलासह मोहपा, कळमेश्वर, अहमदनगरच्या एका 44 वर्षीय व्यक्तीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान चिमुकल्यासह 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. श्‍वास घेण्यास त्रास होता. याशिवाय ताप, सर्दी, खोकल्यासह इतर सारीचे लक्षणे दिसून आली. यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली. कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. सध्या मेडिकलमध्ये सारीच्या सुमारे 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मेयोतही याहून जास्त सारीचे रुग्ण दाखल आहेत. विशेष असे की, विदर्भात सारीचे सर्वाधिक रुग्ण नागपुरात आहेत. विदर्भात 27 मे 1277 सारीच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 580 रुग्ण हे केवळ नागपूर जिल्ह्यातील आहेत. मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत सारीचे सुमारे 40 मृत्यू झाल्याची नोंद आहे.

अकोल्यात रुग्णांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह अहवाल-  794
  • मयत - 36
  • आत्महत्या - 1 
  • डिस्चार्ज - 531
  • दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - 226

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com