आता काय बोलावं! `या` रुग्णालयात परिचारिका रुग्णसेवा सोडून करतात मांजरीची सेवा

The nurses feel the animals are closer than the patient
The nurses feel the animals are closer than the patient
Updated on

नागपुर : सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात परिचारिकांना रुग्णसेवेपेक्षा जनावरे जवळची वाटत आहेत. यामुळे थेट वॉर्डातच मांजरीची देखभाल केली जात आहे.

प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया झालेल्या मातेला येथील परिचारिका हात लावायला तयार नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. विशेष असे की, खाटेवरच्या बेडशीट रुग्णांच्या नातेवाईकांनी बाहेर घेऊन डस्टबीनमध्ये टाकण्याची सक्ती करण्यात येत असल्याचे प्रकारही पुढे आले आहेत. 

सहा जून ते दहा जून 2020 या कालावधीतील हा प्रकार. पायल पंकज नानरवरे ही गर्भवती माता प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल झाली. मात्र येथील परिचारिकांकडून त्यांना सातत्याने उर्मपटणाची वागणूक मिळत होती. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये वॉर्डात चक्क मांजर पाळली आहे.

या मांजराची देखभाल परिचारिकांकडून करण्यात येत असताना रुग्णसेवेला मात्र फाटा देण्यात येत असल्याचा आक्षेप आहे. पायल नारनवरे यांना प्रसूतीनंतर वॉर्डात आणल्यानंतर परिचारिकांची मग्रूरी सहन करावी लागली. रुग्णांच्या कपड्यांना हात लावणार नाही, असे परिचारिका सांगत आहेत.

बेडशीट रुग्णांनी वा त्यांच्या नातेवाईकांनी बदलवावी, जमत नसेल तर वॉर्डाच्या बाहेर निघून जावे अशी धमकीवजा भाषा परिचारिका वापरतात असेही तक्रारीत नारनवरे यांनी नमूद केले आहे. 

खडू विकत आणा 
प्रसूतीनंतर पायल नारनवरे यांना सलाईन लावण्यात आले. सलाईन संपल्याचे वारंवार सांगूनही सलाईनची बाटली बदलली जात नव्हती. रुग्णालयातील महिला सफाई कर्मचारी रुग्णाचे व रुग्णाच्या नातेवाईकांचे सोबत असलेलेल साहित्य फेकण्याची धमकी देतात रुग्णांशी एकेरी भाषेचा वापर करतात.

रुग्णाच्या खाटेजवळ मुंग्या लागल्यामुळे सांगण्यात आल्यानंतर लक्ष्मण रेषेचा खडू तूम्हीच विकत आणास असे सांगण्यात येते. या तक्रारीचे निवेदन आरोग्य मंत्री, कामगार आयुक्त वैद्यकीय यांच्याकडे तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. 

पायल यांच्यावर प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया झाली आहे. यादरम्यान त्यांना वॉर्डात परिचारिक, सफाई कामगार यांच्याकडून त्रास झाल्याची तक्रार प्राप्त होताच परिचारिकांवर कारवाईसंदर्भात 10 जून रोजी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. 
- डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com