नागपूर विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा रद्द, प्रवेशपत्र पोहचलेच नाही

Demand for postpone of online exams of the university
Demand for postpone of online exams of the university

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एक ऑक्टोबरपासून जाहीर केलेली अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. कर्मचारी संपावर असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेशपत्रच पोहचले नव्हते तसेच प्राचार्य फोरमने आक्रमक भूमिका घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.


विशेष म्हणजे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबादर असतील असा वादग्रस्त आदेश विद्यापीठाने काढल्यानंतर परीक्षेसंदर्भात घडामोडींना वेग आला होता. प्राचार्यांनी या आदेशाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

क्लिक करा - सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी दोन दिवसांआधी विद्याथ्र्यांचे ओळखपत्र तयार करून ते महाविद्यालयांना पाठविले होते. ओळखपत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेचा युजर आयडी आणि पासवर्ड होता. मात्र, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाविद्यालयांच्यावतीने अनेक विद्यार्थ्यांना ओळखपत्र देता आले नाही. त्यामुळे प्राचार्य फोरमने परीक्षा समोर ढकला, अशी मागणी केली होती. विद्यापीठाने महाविद्यालयांच्या ईमेलवर पाठवलेल्या परीक्षापत्र डाऊनलोड होण्यास बराच अवधी लागत असल्याचाही तक्रार होती.

परीक्षापत्र पाठवण्यातही घोळ

विद्यापीठाकडून पाठवण्यात आलेल्या परीक्षापत्रांचाही घोळ झाला आहे. एका महाविद्यालयाचे परीक्षापत्र दुसºयाच महाविद्यालयाला गेले आहेत. नागपूरच्या कमला नेहरू महाविद्यालयाचे परीक्षापत्र कोराडी येथील एका महाविद्यालयाला पाठवण्यात आले. या सर्व गोंधळामुळेही प्राचार्य फोरमने विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे.

 
परीक्षेला मुळीच विरोध नाही
विद्यापीठाकडे परीक्षेसाठी मोठी यंत्रणा असून त्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी विद्याथ्र्यांचे ईमेल आयडी, त्यांचे मोबाईल नंबर घेतले आहेत. असे असताना स्वत: परीक्षापत्र न पाठवता कर्मचारी संपाच्या तोंडावर ती जबाबदारी महाविद्यालयांकडे सोपवणे चुकीचे होते. परीक्षेला आमचा मुळीच विरोध नाही. मात्र, सर्व अडचणी लक्षात घेता विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलाव्या यासाठी आम्ही कुलगुरूंना निवेदन दिले होते.
- डॉ. आर.जी. टाले
सचिव, प्राचार्य फोरम.



 निर्णय झाल्यावर नवीन वेळापत्रक 
कर्मचारी संपामुळे एक ऑक्टोबरपासूनच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. परीक्षेबाबत निर्णय झाल्यावर नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येइल.
- डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com