हॅलो, सर तुमचे केवायसी करायचे आहे, ओटीपी सांगा... मग

telecaller
telecaller

नागपूर : पेटीएमच्या केवायसी करण्यासाठी ऍप डाऊनलोड करताच सायबर गुन्हेगाराने खात्यातून दीड लाख रूपये उडविले. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. उदय मनोहर गुप्ते (64) रा. राजेंद्र नगर, हिंगणा रोड असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय गुप्ते यांना अज्ञात आरोपीने फोन केला. "तुमच्या पेटीएमची केवायसी मुदत संपलेली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला 10 हजार रुपये भरावे लागतील' असे सांगून त्यांना "क्वीक सपोर्ट टीमव्हीवर' हे ऍप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले. आरोपीने पेटीएम विभागातून बोलत असल्याचे सांगितल्यामुळे उदय यांचा विश्वास बसला. त्यांनी "क्वीक सपोर्ट टीमव्हीवर' डाऊनलोड केले. डाऊनलोड केल्यानंतर पुन्हा ठगबाजाने उदय यांना फोन केला. त्यांना मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागितला.

पेटीएम केवायसीच्या नावाने दीड लाख गायब 
उदय गुप्ते यांनी ओटीपीनंबर सांगताच त्यांच्या खात्यातून तब्बल 1 लाख 69 हजार 400 रुपयांची रक्कम परस्पर काढण्यात आली. खात्यातून रक्कम काढल्याचा मॅसेज त्यांच्या मोबाईलवर धडकताच त्यांना मोठा धक्का बसला. ही रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यातून वळती करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसगत झाल्याचे समजताच त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रारदाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com