मुख्याध्यापक संघटनेचा खळबळजनक दावा; तब्बल ७० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असल्याची माहिती 

only 30 percent students getting online studies said headmasters community
only 30 percent students getting online studies said headmasters community

नागपूर ः कोरोनामुळे टाळेबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली. याला पर्याय म्हणून शाळांद्वारे ऑनलाइन शिक्षणास सुरुवात करण्यात आली. मात्र, याला चार ते पाच महिन्याचा कालावधी निघून गेला असताना अद्यापही केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांच ऑनलाइन शिक्षण व्यवस्थितरित्या मिळत असल्याचे चित्र असल्याचा दावा मुख्याध्यापक संघटनेने केला आहे.

राज्यात मार्च महिन्यात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. यानंतर जून महिन्यापासून शाळा सुरू करण्यात आल्यात. त्यापूर्वीच सीबीएसई शाळांनी ऑनलाइन शिक्षणास सुरुवात केली. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा गंध नसल्याने बरेच विद्यार्थी त्यापासून वंचित राहील्याचे दिसून आले. 

याशिवाय सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे सोयी सुविधांचा अभाव असल्याने त्यांना ऑनलाइन शिक्षण घेताच आले नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याचे चित्र दिसले. काही महिन्याच्या कालावधीनंतर परिस्थितीमध्ये बदल होणे अपेक्षित होते. मात्र, आजही ती परिस्थिती कायम असून ३० टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून दूर असल्याचे दिसून येत असल्याचे समजते. 

अनेक विद्यार्थ्यांकडे संसाधनाचा तुटवडा असून त्यातूनच ही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येते. याबाबत माहिती देताना स्कूल हेडमास्टर्स चॅरिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष अहमद खान म्हणाले, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे संसाधनाची अनुपल्धता असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचवायचे कसे? हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे अनुदानित शाळांमध्ये आर्थिक मागासलेल्या कुटूंबातील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. त्यामुळे या गटातील मुळे अद्यापही शिक्षणापासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले.

तर बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याचे चित्र असल्याने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यास त्यांच्या निकालावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हेडमास्टर्स चॅरिटेबल असोसिएशनद्वारे तीन महिने प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यावरच यंदाच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, असा निर्णय न झाल्यास बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com