आमदार साहेब, कुठे गेला कोरोना फंड? जिल्ह्यात १६ आमदार केवळ दोघांनी दिला निधी; नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

only two MLAs gave corona fund out of 16 in Nagpur district
only two MLAs gave corona fund out of 16 in Nagpur district

नागपूर : कोरोनाच्या नियंत्रणासाठी आमदार फंडातून २० लाख देण्याचे आदेश शासनाने दिले होते. जिल्ह्यातील फक्त दोनच आमदारांनी आरोग्य विभागाला फंड दिल्याचा खळबळजनक खुलासा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे आमदार कोरोनाबाबत गंभीर नसून नागरिकांच्या आरोग्याची चिंता नसल्याचे दिसते.

मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण समोर आले. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केले. सरकारच्या महसुलावर परिणाम झाल्याने अर्थसंकल्पाला कात्री लावण्याची वेळ आली. आरोग्याकरता निधी कमी पडता कामा नये म्हणून आमदार फंडातील २० लाख रुपये कोरोनासाठी आवश्यक साहित्य आणि उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाला देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला होता. .

नागपूर जिल्ह्यात १२ विधानसभा तर चार विधान परिषद असे सोळा आमदार आहेत. यात तीन मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश आहे. प्रत्येक आमदाराला २० लाखांचा फंड आरोग्य विभागाला द्यायचा होता. परंतु गृहमंत्री अनिल देशमुख आणि आमदार समीर मेघे यांच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांनी आपला निधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिला नाही. त्यामुळे आमदारच कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे दिसते.

१८७१ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

जिल्ह्यात २० ऑक्टोबरपर्यंत १९ हजार ६५९ रुग्ण आढळले. यातील १७ हजार २३९ रुग्ण बरे झाले. तर सध्या ग्रामीण भागात १८७१ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या ५४९ असल्याची माहिती डॉ. सेलोकर यांनी जि.प.च्या सभागृहात दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख व आमदार मेघे यांनी प्रत्येकी १०-१० लाख रुपये दिले. देशमुख यांच्या फंडातील ४ लाख ६४ हजार तर मेघे यांच्या फंडातील ५ लाख ८४ हजार खर्च झाले.
-डॉ. दीपक सेलोकर,
आरोग्य अधिकारी, जि.प. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com