बापरे! नागपुरात ‘चौकीदार चोर है’चा मुद्दा ऐरणीवर; एक घटना ठरली कारणीभूत

The owner's plot sold to other
The owner's plot sold to other

नागपूर : मागील लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी ‘चौकीदार चोर है’चा मुद्दा चांगलाच गाजला होता. विरोधी पक्षाने हा मुद्दा धरून मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. ‘चौकीदार चोर है’च्या घोषणेने रान उठवणारे राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात खेद व्यक्त केला होता. आता उपराजधानीत पुन्हा हा विषय चर्चेला आला आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे कारण...

चौकीदारच चोर निघाल्याची घटना एमआयडीसी हद्दीत उघडकीस आली आहे. येथे एका प्लॉटवर चौकीदार म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीने साथीदाराच्या मदतीने सदर प्लॉटचे अन्य एका महिलेच्या नावे विक्रीपत्र लावून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. प्रमोद शंकर डोंगरे (रा. पांडुरंगनगर, ठाकरे लेआऊट, प्लॉट नं. ४७,) असे प्लॉटवर कार्यतर चौकीदार असलेल्या आरोपीचे नाव आहे. राजवीर शिवनारायण यादव व सुदेशना विनायक गेडाम असे त्याचे दोन आरोपी साथीदारांची नावे आहेत.

सिनू बुधराम होरो (५६, रा. हुलसु बटकाटोली, राची, झारखंड) असे फिर्यादीचे नाव आहे. एमआयडीसी हद्दीतील पांडुरंगनगर, ठाकरे ले-आऊट येथे प्लॉट नं. ४७ आहे. सदर प्लॉटवरील चौकीदार प्रमोद याने साथीदार यादव याच्याशी संगणमत करून कु. सुदेशना हिच्या नावे विक्रीपत्र लावल्याची बाब समोर आली.

यासाठी तिघांही संगनमत करून बनावट कागदपत्राचा वापर केल्याचे समोर आले. ही बाब फिर्यादी होरो यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीअंती तिन्ही आरोपींविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मालक सांगून विकला भूखंड

प्लॉटच्या मुळ मालकाऐवजी त्याजागी बनावट आधारकार्डच्या आधारे अन्य महिलेला उभे करून आरोपींनी संगणमताने दुय्यम निबंधक कार्यालयातून तिघांच्या नावे विक्रीपत्र लावून दिले. शेवटी ही बाब प्लॉट मालक महिलेच्या एकुलत्या एका मुलीला कळली. तिने थेट वाठोडा पोलिस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सारीका वसंतराव नागपूरे (४०, रा. पाटनी टाऊन, काटोल रोड) असे फिर्यादी मुलीचे नाव आहे. राहुल आनंदराव माळवे, मिलिंद आनंदराव माळवे, पारधी, बदरुल अंसारी, अनिल किसन मुळेवार, बनावट महिला विनोदीनी येवले अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी सारीका यांच्या आईच्या नावे वाठोडा हद्दीत कृषक हाऊसिंग सोसायटीच्या लेआऊटमधील प्लॉट क्र. १३ हा आहे. आईच्या प्लॉटची वारसान मालाक म्हणून फिर्यादी सारीका आहेत. असे असताना आरोपींनी संगणमत करून अन्य महिलेला मालक म्हणून समोर केले आणि ३० लाख रुपये घेऊन प्लॉटचा आरोपी राहुल, मिलिंद व पारधी यांच्याशी केला. मालक नसूनही त्यांनी बनावट आधार कार्डसह स्टॅम्प पेपरचा वापर करून तिघांनाही कब्जापत्र दिले. ही बाब फिर्यादी सारीका यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट वाठोडा पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com