ट्रॅकवरील मेट्रोत झाला बिघाड अन् प्रवाशांमध्ये रंगली चर्चा, शेवटी कारण समजताच बसला आश्चर्याचा धक्का

passengers surprise by seeing metro mock drill in nagpur
passengers surprise by seeing metro mock drill in nagpur

नागपूर : ट्रॅकवर धावणारी मेट्रो अचानक थांबली. ट्रेन ऑपरेटरद्वारे तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो पुढे जाऊ शकत नाही, असा संदेश माइकद्वारे देण्यात आला अन् प्रवासी आश्चर्यचकीत झाले. लगेच सात मिनिटांत दुसरी मेट्रो ट्रेन आली आणि बंद पडलेल्या मेट्रोला नजीकच्या स्टेशनपर्यंत पोहोचविले. या सर्व प्रकारात मात्र तांत्रिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ प्रवाशांनी अनुभवली. 

शनिवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास महामेट्रोच्या एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशन येथून खापरी मेट्रो स्टेशनकडे निघालेल्या ट्रेनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशन ते न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशनदरम्यान अचानक मेट्रो थांबल्याने प्रवास करीत असलेल्या ४५ प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय सुरू झाला. त्याच वेळी ट्रेन ऑपरेटरने कॅबिनमधून माइकद्वारे प्रवाशांना तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. थोड्याच वेळात बंद पडलेल्या ट्रेनला दुसऱ्या ट्रेनच्या साह्याने ओढून नजीकच्या न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत नेण्यात येईल व तेथून पुढील प्रवासासाठी दुसरी ट्रेन मेट्रो प्रवाशांना उपलब्ध होऊ शकेल, असे संदेश मिळताच नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेल्या मेट्रो ट्रेनला ओढण्यासाठी खापरी मेट्रो स्टेशन येथून दुसरी मेट्रो ट्रेन सात मिनिटांत पोहोचली. बंद ट्रेनला दहा मिनिटांत दुसरी ट्रेन जोडण्यात आली. त्यानंतर पाच मिनिटांत बंद ट्रेनला नजीकच्या मेट्रो स्टेशनपर्यंत आणण्यात आले. प्रवाशांनी न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे उतरून दुसऱ्या ट्रेनने पुढील प्रवास केला. तांत्रिक बिघाड असलेल्या ट्रेनला दुरुस्तीकरिता मिहान डेपो येथे पाठविण्यात आले. पण, हे सर्व नियोजित होतं. 

हेही वाचा - शंकरबाबांची २४ वी लेक विवाहबद्ध; वधुपिता गृहमंत्री, तर जिल्हाधिकारी बनले वरपिता
 
नियोजित थरार, मेट्रोची 'लीला' -
सर्व घटनाक्रम झाल्यानंतर फसगत झाल्याचे प्रवाशांना समजले. मुळात प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महामेट्रो अशाप्रकारे मॉक ड्रिल करीत असते. ट्रॅक ते स्टेशनपर्यंत घडलेल्या सर्व घटना या नियोजित होत्या. ते केवळ मेट्रोची मॉक ड्रिल प्रकारातील एक लीला होती, हे कळताच प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, या थराराने मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी उत्तम सेवा देण्यासाठी किती राबतात, हेही स्पष्ट झाले. महामेट्रो कामगारांसह प्रवाशांच्या सुरक्षतेलाही प्राधान्य देत आहे. आतापर्यंत महामेट्रोने ३०० हून अधिक वेळा मॉक ड्रिल करीत प्रवाशांना, तर कधी कर्मचाऱ्यांना धक्का दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com