धोक्याची घंटा! महिनाभरातील मृत्यूंचा उच्चांक; कोरोनाबाधितांसह वाढला मृत्यूचा टक्का

The percentage of deaths increased with corona virus on this month
The percentage of deaths increased with corona virus on this month

नागपूर : मागील तीन दिवसांपासून कोरोनामुक्तांपेक्षा बाधितांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे या महिन्यात पहिल्यांदाच १२ मृत्यूंची नोंद झाली. यामुळे ही धोक्याची घंटा ठरते की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

गुरुवारी नागपूर जिल्ह्यात ४४३ कोरोनाबाधितांची भर पडल्याने बाधितांचा आकडा १ लाख ७ हजार ६५६ वर पोहचला आहे. तर २४ तासांमध्ये १२ मृत्यू झाले. यामुळे जिल्ह्यात मृतकांची संख्या ३ हजार ५५० झाली आहे. कोरोना नियंत्रणात राज्याच्या तुलनेत नागपूर अव्वल आहे. कोरोनावर मात करण्याचा दर सुमारे ९४ टक्क्यांजवळ पोहचला आहे. मात्र कोरोनामुक्तीचा आलेख तीन दिवसांपासून खाली येत आहे. गुरूवारी अवघे २२४ जण कोरोनामुक्त झाले.

काल पाऊणेसात हजार कोरोना चाचण्या झाल्या. तर गुरुवारी ६ हजार २९७ चाचण्या झाल्या. चाचण्यांचा वेग वाढला, त्याचबरोबर कोरोनाबाधित आढळून येण्याचा टक्का वाढला आहे. आतापर्यंत चाचण्यांची संख्या ७ लाख १२ हजार ५९८ वर पोहचली आहे. आज नोंद झालेल्या ४४३ बाधितांपैकी ३५७ जण नागपूर शहरातील आहेत. तर ८२ जण ग्रामीण भागातील आहेत.

सध्या जिल्ह्याबाहेरून रेफर होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज अवघे चार जण रेफर करण्यात आले. यामुळे जिल्ह्याबाहेरून नागपुरात रेफर झाल्यानंतर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्यांची संख्या ६४४ झाली आहे. तर शहरातील ८४ हजार९४७ जणांना कोरोनाची बाधा झाली.

जिल्ह्यातील १३ तालुक्यामधील २२ हजार ६५ जणांना आतापर्यंत कोरोना झाला आहे. जिल्ह्यात १ लाख १ लाख ७ हजार ६५६ कोरोनाबाधितांपैकी १ लाख ५९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ३ हजार ५०८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरातही वाढले मृत्यू

मागील ८ दिवसांपासून शहरात तीन पेक्षा जास्त मृत्यू होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत होते. मात्र गुरूवारी जिल्ह्यात १२ मृत्यू झाले. यापैकी ५ मृत्यू शहरात झाले आहेत. शहरातील मृत्यूचा टक्का वाढल्यामुळे आता प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे. शहरात आतापर्यंत २ हजार ४८६ मृत्यू झाले. तर ग्रामीण भागात ६०२ मृत्यू झाले. तर आतापर्यंत जिल्ह्यात रेफर झालेल्या ४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com