esakal | स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र, काय असेल कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Pintu Jhalke wrote a letter to the Chief Minister

आता मागील वर्षीचे राज्य सरकारकडील थकीत मिळाल्यास अर्थसंकल्पात त्याचा समावेश करून विकासकामांची तरतूद करणे शक्‍य असल्याचे लक्षात येताच स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी थकीत रकम वसूल करण्याचा निर्धार केला.

स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र, काय असेल कारण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेचे आर्थिक स्रोत मर्यादित आहेत. लॉकडाउनमुळे उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे आता स्थायी समितीने राज्य सरकारकडे थकीत रकमेवर नजर केंद्रित केली. मागील वर्षीचा राज्य सरकारकडून मिळणारा निधी थकीत आहे. मागील दोन महिन्यांत जीएसटीतील थकीत रक्कम असे एकूण 385 कोटी रुपयांची मागणी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 

स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी महापालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पासाठी तयारी सुरू केली आहे. यातून त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मालमत्ता करातून मागील दोन महिन्यांत अत्यल्प उत्पन्न मिळाले. इतर विभागाची स्थितीही समाधानकारक नाही. याच आढावा बैठकीमधून मागील 2019-20 या वर्षातील विविध योजनांसाठीचा 299.70 कोटींचा निधी राज्य सरकारकडे थकीत असल्याची बाब पुढे आली आहे.

क्लिक करा - तुकाराम मुंढेंचा दणका : फडणवीस यांच्या कार्यकाळातील कर्मचाऱ्यांना केले पुन्हा बडतर्फ

महापालिकेच्या उत्पन्नाचा विचार केल्यास स्थायी समितीचा अर्थसंकल्प पूर्ण कसा होणार, असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांना पडला होता. आता मागील वर्षीचे राज्य सरकारकडील थकीत मिळाल्यास अर्थसंकल्पात त्याचा समावेश करून विकासकामांची तरतूद करणे शक्‍य असल्याचे लक्षात येताच स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी थकीत रकम वसूल करण्याचा निर्धार केला. 

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पत्र

मागील वर्षीचे 299.70 कोटी तसेच मागील दोन महिन्यांत एकूण कपात केलेले जीएसटीचे 86.10 कोटी, असे एकूण 385.77 कोटी रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यामार्फत पाठविले आहे.