नागपुरात पॉश इमारतीतील 'सेक्स रॅकेट'वर छापा, तीन दलालांना अटक

अनिल कांबळे
Wednesday, 18 November 2020

पोलिसांनी मंगळवारी एक पंटर दलाल स्वप्नील वर्धे याच्याकडे पाठवला. त्याने आंबटशौकीन असल्याचे सांगून तरुणीची मागणी केली. त्याने सौदा पक्का करण्यासाठी पवन मोहरिया याच्याकडे नेले. त्याने फ्लॅटवर नेले.

नागपूर : सक्करदऱ्यातील पॉश इमारतीत सुरू असलेल्या 'सेक्स रॅकेट'वर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या छाप्यात तीन दलालांना अटक करण्यात आली, तर एका वारांगणा तरुणीची सुटका करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सेक्स रॅकेट सुरू होते, अशी माहिती आहे.  

हेही वाचा - बावनकुळेंनी केलेल्या काळ्या धंद्यामुळेच भाजपने त्यांचे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्करदऱ्यातील हर्षवर्धन अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट सुरू होते. आरोपी महेश विठ्ठलराव पांधरे (३१), स्वप्नील बाबारावजी वर्धे (२५) आणि पवन भाऊराव मोहरिया (२५) हे तिनही दलाल फ्लॅटमध्ये देहव्यापार करण्यासाठी तरूणींना ठेवत होते. तसेच आंबटशौकीन ग्राहकांना तरुणी पुरवित होते. गेल्या अनेक दिवसांपासून फ्लॅटमध्ये तरुण आणि तरुणींचे येणे-जाणे वाढले होते. त्यामुळे शेजाऱ्यांनाही काहीतरी अनुचित होत असल्याचे लक्षात आले होते. या प्रकाराची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख सार्थक नेहते यांना मिळाली. त्यांनी लगेच पंटर पाठवून सापळा कारवाई करण्याचे निर्देश पथकाला दिले.

हेही वाचा - वडगावातील गांजाचा धूर धोकादायक; अल्पवयीन मुलेही...

पोलिसांनी मंगळवारी एक पंटर दलाल स्वप्नील वर्धे याच्याकडे पाठवला. त्याने आंबटशौकीन असल्याचे सांगून तरुणीची मागणी केली. त्याने सौदा पक्का करण्यासाठी पवन मोहरिया याच्याकडे नेले. त्याने फ्लॅटवर नेले. तेथे एका रूममध्ये तरूणी बसलेली होती. त्याने पंटरकडून पैसे घेतले आणि तो निघून गेला. पंटरने इमारतीच्या खाली सापळा रचून बसलेल्या पोलिसांना इशारा दिला. लगेच पोलिसांनी छापा घालून तरुणीला ताब्यात  घेतले, तर तिन्ही दलालांना अटक केली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय सार्थक नेहते, एपीआय सुरेश सुरोशे, स्मिता सोनवणे. राशिद शेख, संदीप चंगोले, भूषण झाडे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police raid on sex racket at sakkardara of nagpur

Tags
टॉपिकस
Topic Tags: