esakal | हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन मॉडेलची सुटका

बोलून बातमी शोधा

Police release three models Nagpur crime news

ठरल्याप्रमाणे पंटरला आत पाठविण्यात आले. त्याने इशारा देताच दबा धरून बसलेल्या पथकाने छापा टाकला. येथी तीन मुली आढळू आल्या. त्या परराज्यातील असून मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमाविण्यासाठी आल्या होत्या.

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन मॉडेलची सुटका
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : विविध राज्यांमधील मॉडेलिंग करणाऱ्या युवतींना जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला यश आले आहे. गणेशपेठेतील हॉटेलवर गुरुवारी छापा टाकून पोलिसांनी तीन मॉडेलची सुटका केली. सेक्स रॅकेटच्या सूत्रधाराला ताब्यात घेतले आहे.

दिपेश ऊर्फ गगन कानाबार (३६, रा. सतनामीनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा रेहन नावाचा साथीदार फरार झाला आहे. गणेशपेठ बसस्थानकाजवळील क्रिष्णा हॉटेलमध्ये हा रॅकेट सुरू होते. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली त्या आधारे गुरुवारी सायंकाळी ७ वाजता सापळा रचण्यात आला.

महत्त्वाची बातमी - अकोल्यासह विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत

ठरल्याप्रमाणे पंटरला आत पाठविण्यात आले. त्याने इशारा देताच दबा धरून बसलेल्या पथकाने छापा टाकला. येथी तीन मुली आढळू आल्या. त्या परराज्यातील असून मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमाविण्यासाठी आल्या होत्या. पैशांचे आमिष दाखवून त्यांना हा व्यवसाय करण्यास भाग पाडण्या आल्याची बाब समोर आली आहे.

महिलेला डांबून अत्याचार; फेसबुक मित्राचे कृत्य

फेसबुक फ्रेंडने लग्नाचे आमिष दाखवून मिहेसोबत शारीरिक संबंध जोडले. तिच्या नकळत एकांतातील क्षणांचा व्हिडियो तयार केला. येवढेच नाही तर तिला एका घरात डांबून ठेवत बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. नितीन थोरात (३०, रा. यसुरणा, अचलपूर) असे आरोपीचे नाव सांगण्यात येते.

आरोपी व पीडितेची फेसबूकवरून मैत्री झाली होती. अल्पावधितच प्रेमफुलले. ऑक्टोबर २०२० मध्ये सर्वप्रथम सीताबर्डीत त्यांची भेट झाली. जवळच्याच एका लॉजमध्ये त्यांच्यात संबंध राहिले. त्यावेळी आरोपीने पीडितेच्या नकळत व्हिडियो तयार केला होता. याप्रकारानंतर महिलेने त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. पण, तो भेटीसाठी दबाव टाकायचा.

अधिक माहितीसाठी - कोणी नोकरी देता का नोकरी? वकिलांना घरभाडे देणेही झाले कठीण

सतत नकार मिळत असल्याने वारंवार फोन करून ठार मारण्याची धमकी देत होता. त्याने अश्लिल व्हिडियो व्हायरल करण्याचीही धमकी दिली. प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ३ मार्च २०२१ रोजी अमरावतीत भेटण्याचे ठरले. त्यानुसार पीडिता अमरावताला गेली असता आरोपीने तिला डांबून ठेवले आणि अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेने सीताबर्डी ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.