आलिशान फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट; महिला दलालास अटक, तरुणीची सुटका

Police released the girl Nagpur crime news
Police released the girl Nagpur crime news

नागपूर : जरीपटका परिसरातील आलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा घातला. एका महिला दलालाला अटक केली. तर, वेश्‍याव्यवसाय करण्यास बाध्य झालेल्या तरुणीची पोलिसांनी सुटका केली. अनिता राजू डोंगरे (४०) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

समतानगर परिसरातील आरमोर टाऊनमधील फ्लॅट क्रमांक ४१ मध्ये राहणारी अनिता डोंगरे ही देहव्यापार करीत असल्याची माहिती जरीपटका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अनिताच्या फ्लॅटमध्ये बनावट ग्राहक पाठवला. अनिताने तरुणी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

दोघांत तीन हजार रुपयांत सौदा ठरला. अनिताने एका तरुणीला फोन केला. अनिताने पंटरकडून पैसे घेतले आणि पंटरसोबत त्या तरुणीला खोलीत बंद केले. पंटरने इशारा करताच पोलिसांनी अनिताला ताब्यात घेतले. अनितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

वरली-मटका अड्ड्यावर छापा

संत ज्ञानेश्वर सोसायटी येथे राहणारा रेहमान शरीफ बेग (वय ६३) हा घरी सट्टाअड्डा चालवितो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी सायंकाळी विशेष पथकाने अड्ड्यावर धाड घातली. या धाडीत रेहमान शरीफ बेग (६३), इमरान रेहमान बेग (२९), जफरखान मो. रियाज खान (४५), अब्दुल रहमान शेख (५५) दोन्ही रा. ताजनगर, मानकापूर आणि समीर सय्यद रफीक सय्यद (३५) हे जाळ्यात अडकले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख ३१ हजार ५०० रुपये आणि इतर साहित्य असा १ लाख २८ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक निरीक्षक दिलीप चंदन व त्यांच्या सहकाऱ्‍यांनी ही कारवाई केली. 

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव टिप्परने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीचालक युवक जागीच ठार झाला. सूरज खन्ना बुधबावरे (वय २९, रा. कान्होलीबारा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. सूरज व त्याचे मित्र, अभय अशोक सोमनकर (वय २८, रा. झेंडा चौक) आणि विलास राजू मडावी (वय २८) हे दुचाकीने ट्रिपलसिट जात होते. वर्धा मार्गावरील महेश ढाब्यासमोरून जात असताना समोरून आलेल्या टिप्परने धडक दिली. तिघांनाही मेडिकलमध्ये नेले असता उपचारादरम्यान सूरजचा मृत्यू झाला. बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com