नागपुरात आंदोलन करणाऱ्या 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले; रविकांत तुपकर यांच्यासह अनेकजण पोलिसांच्या ताब्यात  

police stopped swabhimani party people to protest in Nagpur
police stopped swabhimani party people to protest in Nagpur

नागपूर, ः शेतकऱ्यांच्या मागण्यांची केंद्र सरकारने दखल घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यात येणार होती. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे शेकडो कार्यकर्ते गडकरींच्या घराकडे जाताना पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले आहे.  

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी आज सकाळी संविधान चौकातून गडकरी यांच्या वर्धारोडवरील घराकडे रवाना झाले होते. . शेतकऱ्यांना किमान हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी तालुकानिहाय सीसीआयचे खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरू करावे, सोयाबीनचे सह हजार रुपये प्रतिक्विटंल भाव स्थिर करावे, पीक विमान कंपन्यांना विम्याची रक्कम देण्यासाठी केंद्र सरकारने बाध्य करावे, केंद्राचे कृषी विधेयक रद्द करावे या प्रमुख मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आहेत. 

या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविकांत तुपकर, विदर्भ अध्यक्ष दामोधर इंगोले व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करणार होते. 

आज नितीन अदाकारी यांच्या निवासस्थानाकडे जातं पोलिसांना कार्यकर्त्यांनामध्येच रोखण्याचा प्रयत्न केला.. यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झालेत. परिस्थिती अधिक चिघळू आये म्हणून पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या कार्यकर्त्यांना आता पोलिस मुख्यलयात नेले जाणार आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.  

यावेळी काही कार्यकर्त्यांकडून पोलिसांची दादागिरी चालणार नाही अशाप्रकारच्या घोषणाही देण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरात नसतानाही स्वाभिमानीकडून हे आंदोलन करण्यात येणार होते.   

आज महात्मा गांधींच्या मार्गाने आलो पण..

अशा प्रकारचे आंदोलन स्वाभिमानीकडून होणारही याबद्दलची पूर्वसूचना देण्यात आली होती. आम्ही गडकरींच्या घरासमोर घरासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार होतो. मात्र पोलिसांची ही दडपशाही आहे. यावेळी महात्मा गांधींच्या मार्गाने आलो तर पुढच्या वेळी भगत सिंग यांच्या मार्गाने आंदोलन करू असा इशारा काही कार्यकर्त्यांनी दिला आहे.    

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com