नागरिकांनो! काळजी घ्या, प्रदूषणाची धोक्याची घंटा; वाचा किती आहे निर्देशांक?

pollution index reached up to 152 in nagpur
pollution index reached up to 152 in nagpur
Updated on

नागपूर : टाळेबंदीत शिथिलता मिळताच शहरातील प्रदूषणाची पातळी वाढू लागली आहे. बुधवारी सिव्हिल लाइन्स येथील हवा प्रदूषण निर्देशांक १५२ वर पोहोचला आहे. हवा प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली असून आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. 

कोरोना काळात टाळेबंदीमुळे रस्त्यावरील वाहतूक जवळजवळ बंद झाली होती. त्यामुळे हवेच्या प्रदूषणाचा आलेख बराच खाली आला होता. आता टाळेबंदीत शिथीलता येताच प्रदूषणात वाढ झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रदूषणाचा आलेख आता वाढू लागला आहे. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक पीएम २.५, पीएम १०, कार्बन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यासारख्या आठ मापदंडावर मोजले जाते. पीएम २.५ आणि पीएम १० वगळता इतर मापदंडात फारसा बदल दिसून येत नाही. ही दोन्ही प्रदूषके शहरातील प्रदूषणाच्या पातळीत बदल करण्यात मोठी भूमिका बजावतात. शहरातील वर्दळ पुन्हा एकदा वाढू लागल्यानंतर या प्रदूषकांमध्येही वाढ होत आहे. शहरातील वाहतूक बऱ्याचअंशी सुरू झाल्यानंतर हवा गुणवत्ता निर्देशांक ५०-६० वरून १५०-१५२ च्या दरम्यान गेला. विशेष म्हणजे, महापालिकेकडून हवा प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने फारसे प्रयत्न होत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. 

आजारांना निमंत्रण -
हवेतील प्रदूषणासाठी प्रामुख्याने वाहनांसोबतच, बांधकाम, रस्ते आणि इतर विकासकामे कारणीभूत ठरतात. या कामातून वातावरणात पसरणारे अतिसूक्ष्मकण, वाहनातून बाहेर पडणारे विषारी वायू प्रदूषणात वाढ करतात. टाळेबंदीत काही महिने प्रदूषणमुक्त वातावरणात राहिल्याने अस्थमा, हृदयरोग यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना आता प्रदूषणाचा त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com