esakal | ऑन दी स्पॉट : पीपीई किट निकृष्ट दर्जाच्या; किट घालताच शरीरातील पाणी होते कमी

बोलून बातमी शोधा

PPE kit inferior The body water was reduced as soon as the kit was inserted}

उन्हाळ्यात उपलब्ध करण्यात येणाऱ्या पीपीई किट लॅमिनेटेड म्हणजे प्लास्टिक कोट असल्याने कोरोना योद्ध्यांनाच आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांवर अधिष्ठातांना वेळ मागितला. मात्र चर्चेला वेळ न देता पोलिसांना मध्यस्थीसाठी बोलावले, असे संघटनेचे अध्यक्ष प्रेमराज बोबडे म्हणाले. 

nagpur
ऑन दी स्पॉट : पीपीई किट निकृष्ट दर्जाच्या; किट घालताच शरीरातील पाणी होते कमी
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : दुपारची वेळ. उकाडा वाढत होता. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) कोविड वॉर्ड. सफाई कामगारांपासून तर परिचारिका, डॉक्टर सारेच कोरोनाबाधितांवरील कर्तव्य बजावत होते. अचानक पीपीई किटमध्ये तैनात ब्रदरला भोवळ आली. खाली पडणार तोच दुसऱ्या एका मित्राने त्याचा तोल सांभाळला. काही वेळानंतर विचारणा केली असता प्लॅस्टिकच्या पीपीई किटचा वापर होत असल्यानेच काही वेळातच शरीरातील पाणी तसेच साखर कमी झाल्यासारखे वाटते. भोवळ येते. पूर्वीच्या तुलनेत पीपीई किटचा दर्जा सांभाळला जात नाही, तर हातमोजे आणि आयव्ही सेटचा तुटवडा असल्याची परिचारिकांची तक्रार त्यांनी नोंदवली.

कोरोनाबाधितांचे जीव वाचविण्यासाठी आठ तास संरक्षणात्मक पीपीई किट घालून सेवा देणारेच कोरोना योद्धे आजारी पडत असल्याची तक्रार नोदवल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. विशेष असे की, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. सहा तासांवर पीपीई किट घालून काम केल्यास डिहायड्रेशन, डोके दुखी, चक्कर तसेच शरीरातील पाणी कमी होत असल्याच्या तक्रारी अनेक परिचारिकांनी नोंदवल्या आहेत. प्लॅस्टिक लॅमिनेटेड असलेली किट मेयोमधून हद्दपार करून त्या ऐवजी उच्चदर्जाच्या किट पुरवण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या आरोग्य विभाग कर्मचारी शाखेतर्फे करण्यात आली आहे.

जाणून घ्या - प्रेम एकीवर अन् साक्षगंध दुसरीशी; विवाहित प्रेयसीवर बलात्कार तर होणाऱ्या पत्नीला दिला दगा

उकाड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. कोरोना वॉर्ड फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. अशा युद्धजन्य स्थितीत खऱ्या डॉक्टर परिचारिका लढवय्यांसारखे काम करीत आहेत. ड्यूटीची वेळ संपल्यानंतरच पीपीई किट काढून कचरापेटीमध्ये टाकावी लागते.

उन्हाळ्यात उपलब्ध करण्यात येणाऱ्या पीपीई किट लॅमिनेटेड म्हणजे प्लास्टिक कोट असल्याने कोरोना योद्ध्यांनाच आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांवर अधिष्ठातांना वेळ मागितला. मात्र चर्चेला वेळ न देता पोलिसांना मध्यस्थीसाठी बोलावले, असे संघटनेचे अध्यक्ष प्रेमराज बोबडे म्हणाले. 

तासाभरात कपडे होतात ओले

उकाड्यात पीपीई किट घालून रुग्णसेवा देणे कठीण आहे. किट घातल्यानंतर शरीराला हवा मिळत नाही. घाम जास्त येतो. तासाभरात संपूर्ण कपडे ओले होतात. शरीरातील पाणी कमी होते. पीपीई किट घालण्यापूर्वी डोक्यात कव्हर कॅप घातली जाते. डोकेदुखी होते. परिचारिकांना भोवळ येऊन पडण्याचा घटना वाढल्या असल्याचीही तक्रार या परिचारिकेने केली आहे. त्यातच हातमोजे , आयव्ही सेट नाहीत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी पोलिसांच्या मदतीने दडपशाहीचे धोरण लादत आहे, असा आरोप संघटनेतर्फे केला आहे. 

जाणून घ्या - पोटासाठी पोलिस शिपाई झाला, नक्षलग्रस्त भागात नोकरी केली अन् आता थेट बनला PSI

पीपीई किटचा दर्जा तपासण्यात येईल
कोविड काळात डॉक्टर असो, परिचारिका असो की, इतर कर्मचारी रात्रीचा दिवस करीत सेवा देत आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी पीपीई किटपासून तर मास्क व इतर साहित्य उपलब्ध आहे. पीपीई किटचा दर्जा तपासण्यात येईल. हातमोजांचे प्रमाण काही प्रमाणात कमी आहे. संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या चुकीच्या वागण्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होतो. ही भावना लक्षात घेत इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. 
- डॉ. अजय केवलिया, मेयो