मोठी बातमी : 'लुटेरी दुल्हन' प्रीती दासला मिळाला जामीन, आता

मंगेश गोमासे
Thursday, 10 September 2020

पोलिसांनी लगेच प्रीतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर लकडगंजमध्ये राहणाऱ्या पौनीकर नावाच्या युवकाकडून पैसे वसुली करण्यासाठी प्रीती दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह त्याच्या घरी गेली होती. तसेच जरीपटका पोलिसात तिच्यावर कलम ३८४ नुसार गुन्हा दाखल आहे.

नागपूर : नोकरी लावून देण्याच्या नावावर पैसे उकळणाऱ्या प्रीती दासला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ९) २५ हजारांच्या जातमुचलकावर जामीन दिला आहे.

प्रीती दास विरोधात वर्धा येथील निवासी पांडे नावाच्या युवकाने सीताबर्डी येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत प्रीती दासने त्याच्याकडून ओसीडब्लु येथे नोकरी लावून देण्यासाठी दोन लाख रुपये घेतल्याचे नमूद केले होते.

जाणून घ्या - अमरावतीला लाभल्या तडफदार पहिल्या महिला पोलिस आयुक्त

या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी प्रीती दास विरोधात कलम ४२०अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची बुधवारी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान प्रीती दास यांना २५ हजारांच्या जातमुचलकावर जामीन दिला.

प्रीती दासने गुड्डू तिवारी या युवकाला लग्नाचे आमिष दाखवले आणि त्याच्याकडून तब्बल १४ लाख रुपये उकळले होते. याशिवाय त्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली होती. तसेच पैसेही परत न करण्याची धमकी दिली. त्यामुळे गुड्डू तिवारीने पाचपावली पोलिस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून लुटल्याची तक्रार दिली.

अधिक माहितीसाठी - Big News : एनसीबीच्या चौकशीत रिया ढसा ढसा रडली; ड्रग्सबाबत केला मोठा खुलासा, वाचा सविस्तर

पोलिसांनी लगेच प्रीतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर लकडगंजमध्ये राहणाऱ्या पौनीकर नावाच्या युवकाकडून पैसे वसुली करण्यासाठी प्रीती दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह त्याच्या घरी गेली होती. तसेच जरीपटका पोलिसात तिच्यावर कलम ३८४ नुसार गुन्हा दाखल आहे.

या दोन्ही गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. आता सीताबर्डी ठाण्यातूनही जामीन मिळाला आहे. प्रीती दासकडून ॲड. अशोक रघुते व ॲड. पूजा अग्रवाल यांनी बाजू मांडली. ॲड. रघुते यांच्यानुसार सर्वच प्रकरणात प्रीती दासला जामीन मिळाला असून दासची कारागृहातून सुटका होणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preeti Das gets bail