
प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर प्रिपेड ऑटो सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना किफायतशीर दरात ऑटो मिळतोच. शिवाय सर्व ऑटोचालक नोंदणीकृत असल्याने अप्रिय घटनांना आपसूकच आळा बसतो. आधीच ठरल्याप्रमाणे प्रवाशांना सोडून दिले जाते.
नागपूर ः कोरोनाचे संकट उच्चांकी पातळीवर असताना नागपूर रेल्वेस्थानकावरील एक्झीट गेट बदलले गेले. तिथून प्रवाशांना थेट गेटबाहेर सोडले जाते. स्टेशनवरील प्रिपेड ऑटो बुथ मागेच राहून जात असल्याने ऑटोचालकांना प्रवाशी मिळणे जवळपास बंद झाले असून त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याउलट गेटबाहेर अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या ऑटोचालकांना प्रवासी मिळू लागले आहे. याप्रकाराने बाहेरचे तुपाशी अधिकृत ऑटोचालक मात्र उपाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर प्रिपेड ऑटो सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना किफायतशीर दरात ऑटो मिळतोच. शिवाय सर्व ऑटोचालक नोंदणीकृत असल्याने अप्रिय घटनांना आपसूकच आळा बसतो. आधीच ठरल्याप्रमाणे प्रवाशांना सोडून दिले जाते.
हेही वाचा - शिवांभूचे नियमित सेवन करा अन् रोगप्रतिकारकशक्ती वाढवा; निलांबरी अभ्यंकर यांचा दावा
सेवेचा लाभ लक्षात घेता सामान्य वेळेत प्रिपेड बुथवरील ऑटोचालकांना चांगली मिळकत हाती पडायची. पण, कोरोनाचे संकट गहिरे होताच देश लॉकडाऊन झाला. नियमित रेल्वेगाड्याही बंद करण्यात आल्या. प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष रेल्वेगाड्या तेवढ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यावेळी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेस्थानकावर एन्ट्री व एक्झीटचे गेट वेगवेगळे करण्यात आले. जनरल वेटींग हॉलमधील गेट सुरू करून तिथूनच रेल्वेतून उतरणाऱ्या सर्व प्रवाशांच्या बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली.
कडक लॉकडाऊनच्या काळात ऑटोसेवा पूर्णतः बंदच राहिल्याने ऑटोचालकांची चांगलीच अबाळ झाली. असाबसा कुटुंबाचा गाडा हाकला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरही बराचकाळ प्रिपेड ऑटो बूथ बंदच ठेवण्यात आले होते. आलिकडे प्रिपेड ऑटोबूथ सुरू झाले असले तरी एक्झीटचे गेट कायम ठेवण्यात आले आहे. तिथून प्रवासी थेट बाहेर पडतात प्रिपेड बूथवर परत येणे सोईचे ठरत नाही.
शिवाय अनेकांना प्रिपेड बूथ विशषी माहितीसुद्धा नसते. यामेळे प्रिपेड ऑटोचालकांना प्रवाशी मिळेनासे झाले आहेत. दुसरीकडे बाहेरील ऑटोचालक ऑटो रस्त्याच्या कडेला उभे करून प्रवासी मिळविण्यासाठी गेटसमोर गर्दी करतात. त्यांच्यातच प्रवासी मिळविण्याची स्पर्धा असते.
जाणून घ्या - नागपुर पदवीधर निवडणूक: पराभव नक्की कोणाचा? भाजपचा की संदीप जोशींचा?
दिवस दिवस उभे राहुनही प्रवाशीच मिळत प्रावाशांच्या एक्झीटसाठी पूर्वीप्रमाणेच व्यवस्था करावी किंवा प्रिपेड ऑटोचालकांना सोईची जागातरी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ