फाशीच्या कैद्याकडून जन्मठेपेच्या कैद्याला मारहाण...वाचा काय झाले 

Prisoner Beating by a prisoner in Nagpur jail
Prisoner Beating by a prisoner in Nagpur jail

नागपूर : मुंबई सिरीयल टेन बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या आरोपीने नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला जबर मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या जेलरक्षकावरही हल्ला करण्यात आला. या घटनेने पुन्हा एकदा मध्यवर्ती कारागृह चर्चेत आले असून, धंतोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नावेद हुसेन खान रशीद हुसेन खान (40) आणि मोहम्मद आजम असलम भट (40) अशी आरोपी कैद्यांची नावे आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेद हुसेन हा 11 जुलै 2006च्या मुंबई टेन साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असून, त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यापासून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. मोहम्मद आजम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आला आली. मोहम्मद आजमची वर्तणूक योग्य नसल्याने त्यालाही फाशी यार्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास दोन्ही कैद्यांमध्ये वाद झाला व त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी तेथे तैनात असलेले जेलरक्षक ईश्वरदास तुळशीराम बाहेकर (44, रा. कारागृह वसाहत) यांनी धाव घेतली आणि भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघाही कैद्यांनी बाहेर यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कारागृह प्रशासनाने धंतोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला. 


मुंबई लोकलमध्ये झालेल्या सिरीयल बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी नावेद हुसैन खान याने एका दुसऱ्या कैद्याच्या मदतीने तुरुंगातील सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. दोघांनी सुरक्षा रक्षकास मारहाण केली. मंगळवारी सकाळी नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. धंतोली पोलिसांनी नावेद खान रशीद खान (40) आणि मो. आजम असलम बट (40) यांच्याविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. 2006 मध्ये मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेत सिरीयल बॉम्बस्फोट झाले होते. यात 189 लोकांचा जीव गेला होता. तर 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. 2017 मध्ये नावेद खानसह पाच लोकांना फाशीची तर इतर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठाण्यात आली होती. असे सांगितले जाते की, फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर नावेदसह अनेक दहशतवादी नागपूरच्याच तुरुंगात कैद आहेत. त्यांना फाशी यार्डमध्ये ठेवले आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 7.45 वाजता नावेद, मो. आजमसह इतर कैद्यांना नाश्‍त्यासाठी बाहेर काढण्यात आले होते.

नावेद आणि आजम यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहे. फाशी यार्डमधून निघाल्यानंतर नावेद पुन्हा आजमशी वाद घालू लागला. पाहता-पाहता दोघेही एकमेकांना मारहाण करू लागले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तुरुंगात खळबळ उडाली. तुरुंग निरीक्षक ईश्वरदास बाहेकर यांनी मध्यस्ती करीत दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोघेही संतापले आणि बाहेकर यांनाच मारहाण करू लागले. त्यांना धक्का देऊन खाली पाडले. हे पाहून इतर सुरक्षा रक्षक मदतीसाठी धावले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिली. अधिकारीही लगेच तुरुंगात पोहोचले. त्यांनी नावेद आणि आजमची वेगवेगळी विचारपूस केली. व 
 

नागपूर कारागृह पुन्हा चर्चेत 

नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात मोठ्या संख्येने दहशतवादी आणि नक्षली कैदी आहेत. याकूब मेमनला फाशी दिल्यापासून नागपूर तुरुंग चर्चेत आहे. ताज्या मारहाणीच्या घटनेतील नावेद सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. त्याने मुंबईवरील हल्ला प्रतिबंधित संघटना सीमीच्या वतीने पाकिस्तानच्या मदतीने केला होता. नावेदचा साथीदार मो. सैफल शेख याचा मुख्य सूत्रधार होता. तो लष्कर-ए-तयब्बाचा मुंबई शाखेचा प्रमुख होता. त्यालाही फाशीची शिक्षा झाली आहे. त्याला बॉम्बस्फोटासाठी हवालामार्फत पैसे पाठवण्यात आले होते. त्यांनी लोकल टेनसह वर्ल्ड टेड सेंटर, स्टॉक एक्‍स्चेंजसह अनेक धार्मिक ठिकाणांची रेकी केली होती. यानंतर प्रेशर कुकरमध्ये स्फोटाचे साहित्य ठेवून स्फोट घडविला होता. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com