अकरावीच्या अंतिम फेरीसाठी प्रवेश सुरू; २४ हजारांवर रिक्त जागा; उद्यापर्यंत घेता येणार प्रवेश

मंगेश गोमासे 
Monday, 15 February 2021

अकरावी प्रवेश प्रक्रियेत शहरातील २१६ कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग आहे. त्यात प्रवेशासाठी जुलैपासून प्रक्रिया राबवण्यास सुरवात झाली. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत पहिल्या यादीतील १३ हजार ४५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवले

नागपूर ः केंद्रीय प्रवेश समितीमार्फत घेण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह'च्या दुसऱ्या फेरीसाठी आजपासून प्रवेश देण्यास सुरवात झाली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारपर्यंत (ता. १६) प्रवेश घेण्यात येणार आहे. आतापर्यंत ५९ हजार २५० जागांपैकी ३४ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश नोंदविला असून २४ हजार ७७१ जागा रिक्त आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत शहरातील २१६ कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग आहे. त्यात प्रवेशासाठी जुलैपासून प्रक्रिया राबवण्यास सुरवात झाली. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत पहिल्या यादीतील १३ हजार ४५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवले. मात्र, यानंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलनास सुरवात झाली. त्यामुळे राज्य सरकारने अकरावीच्या प्रवेशास तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली. 

हेही वाचा - केंद्रीयमंत्री गडकरींनी काढले नगरसेवक, आमदारांचे चिमटे...

तब्बल दोन महिने प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होता. मात्र, पुन्हा अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ ते ९ डिसेंबरदरम्यान दुसरी, १५ ते १८ डिसेंबरदरम्यान तिसरी, २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान पहिली विशेष फेरी, ६ ते ८ जानेवारीदरम्यान दुसरी विशेष फेरी तर १३ ते ३० जानेवारीदरम्यान ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह'ची पहिली फेरी घेण्यात आली. 

यादरम्यान ३४ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. आता विभागाने शेवटची ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह' फेरी ५ ते १६ फेब्रुवारीदरम्यान सुरू केली आहे. यामध्ये आजपासून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे अलॉटमेंट देण्यास सुरवात केली आहे. विद्यार्थ्यांना मंगळवारपर्यंत (ता. १६) प्रवेश घेण्यात येणार आहे. यानंतर प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे.

हेही वाचा - ‘भारतात रस्ते इंजिनिअर नव्हे तर राजकारणी बांधतात’

एकूण जागा - ५९,२५०
कला - ९,६६०
वाणिज्य - १७,९२०
विज्ञान - २७,३३०
एमसीव्हीसी - ४,१३०

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Process of 11th admission has begin in Nagpur