नागरिकांनी हिसका दाखवताच टॅंकरने घरोघरी शुद्ध जलवितरण

रूपेश खंडारे
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

गुरुवारी झालेल्या नगरपंचायत मासिक सभेत या विषयावर जोरदार वादावादी झाली व शेवटी नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा झालाच पाहिजे, या विषयावर एकमत घेऊन येत्या दोन दिवसांत घरोघरी टॅंकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला.

पारशिवनी (जि.नागपूर : शहरात होणाऱ्या दूषित काळ्या पाण्याविषयी रणकंदन सुरू असतानाच "सकाळ'ने या वृत्ताला वाचा फोडली."घराघरात नळातून जहर' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित होताच खळबळ उडाली. हा विषय गंभीर असल्याने गुरुवारी झालेल्या नगरपंचायत मासिक सभेत या विषयावर जोरदार वादावादी झाली व शेवटी नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा झालाच पाहिजे, या विषयावर एकमत घेऊन येत्या दोन दिवसांत घरोघरी टॅंकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला.

क्‍लिक करा : युवतीने केला "स्पीड चेक' अन्‌ घडले विपरित

मासिक सभेत गाजला "काळ्या पाण्या'चा प्रश्‍न
नगरसेवकांनी "काही बी करा, नागरिकाना शुद्ध पाणी द्या' असा आग्रह नगरपंचायतच्या बैठकीत लावून धरला. निधीचे कारण नेहमीचे असल्याने नागरिकांनी अशुद्ध व गढूळ पाणी प्यावे का, अशा अनेक प्रश्‍नांचा भडीमार सभेत झाला. नगरसेवक आक्रमक झाल्याने पिठासीन अध्यक्ष प्रतिभा कुंभलकर यांनीही शहरात होत असलेला पाणीपुरवठा हा जनतेच्या जीवांशी खेळण्याचा प्रकार असून तो ताबडतोब बंद केला पाहिजे. त्याकरिता एक काम कमी होईल, पण आधी शुद्ध पाणी नागरिकांना देण्यास उपलब्ध करण्यासाठी जे करता येईल ते करा, पण शुद्ध पाणीपुरवठा झालाच पाहिजे, असा आग्रह धरला. अनिता भड यांनीही हा विषय रेटून धरला. नगरसेवक सागर सायरे, दीपक शिरवळकर या विषयाला घेऊन अधिकच आक्रमक होत जनतेला आम्ही काय उत्तर देऊ ते सांगा म्हणाले. त्यामुळे सभागृहत तणाव निर्माण झाला. त्यामुळे काहीही करा पारशिवनी जनतेला शुद्ध पाणी द्या, ही एकच मागणी आजच्या सभेत गाजली.
क्‍लिक करा : जिच्यावर केला विश्‍वास तिनेच मारला झाडू...
 

पुढील दोन दिवसांत अंमलबजावणी
अखेर सभागृहात नगरसेवकांची आक्रमक वृत्ती, रास्त मागणी व विषय गंभीर असल्याने त्यावर तत्काळ नागरिकांना फिल्टर पाणी टॅंकरद्वारे घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेयात आला. "सकाळ'मधून हा विषय अग्रक्रमाने मांडल्याने त्यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला. आता घरोघरी वापरापुरते व पिण्याचे शुद्ध पाणी टॅंकरने देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील दोन दिवसांत यावर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने तात्काळ पाण्याच्या प्रश्‍नावर पारशिवनीकरांना दिलासा मिळाला आहे.
 

क्‍लिक करा: ऐकावं ते नवलच, उन्हाळी परीक्षेचा डेटाच गुल

"सकाळ'ने फोडली प्रश्‍नाला वाचा
सलग दोन दिवस "सकाळ'मधून या प्रश्‍नाला वाचा फोडल्याने किमान पाणीप्रश्‍नावर इतके रणकंदन झाले व नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा केलाच पाहिजे या विषयावर ग्रामसभेत एकमत घडून आले. त्यामुळे सर्व नागरिकांनी "सकाळ'चे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pure water from house to house with tanker as soon as the citizens hesitate