ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांच्या वर; कोविड योद्धयांच्या परिश्रमाचं फळ 

निलेश डोये 
Thursday, 29 October 2020

अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ आहे, असे गौरवोद्गार जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी काढले. या दरम्यान सेवा देणाऱ्या सर्व जि.प. कर्मचाऱ्यांच्या अभिनंदानाचा ठराव शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मांडला.

नागपूर : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर जि.प.च्या आरोग्य यंत्रणेने योग्य नियोजन करून ग्रामीण भागात शिरकाव होण्यास रोखले. गावोगावी जनजागृती करण्यासह कोविड सेंटरच्या माध्यमातून उपचारासाठी यंत्रणा उभी केली. विशेष म्हणजे शहरात रुग्ण वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने पुढे येऊन जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तर ग्रामीण भागात रुग्ण वाढल्यानंतर योग्य नियोजनाचा परिचय करून देत रिकवरी रेट ९०.२० टक्क्यांवर आणला. 

अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ आहे, असे गौरवोद्गार जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी काढले. या दरम्यान सेवा देणाऱ्या सर्व जि.प. कर्मचाऱ्यांच्या अभिनंदानाचा ठराव शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मांडला.

हेही वाचा - प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले तेराव्याचे जेवण

देशासह राज्यामध्ये कोरोना विषाणुचा वाढता प्रकोप लक्षात घेता आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्यादृष्टीने पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुभारे यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य वेंâद्रांना प्रत्यक्ष भेट देवून तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी कोविड विरोधात लढा देत असताना बाधित होऊ नये, यासाठी तात्काळ २० लाखांचा निधी मंजूर केला.

 त्या निधीतून सॅनिटायजर, मास्क व पिपीई किट खरेदी करण्यात आले. आरोग्य विभागाचे अचूक नियोजन व कोव्हिड प्रतिबंधक उपाययोजनांमुळे ग्रामीण भागात रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. यासाठी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे लाभलेले मार्गदर्शन व पदाधिकारी, सदस्य, लोप्रतिनिधी, आरोग्य अधिकारी, खंडविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी मोठे परिश्रम घेतले. त्यांचे परीश्रम वाखाण्याजोगे असल्याचे गौरवोद्गार अध्यक्षांनी काढले. 

नक्की वाचा - कोरोनाच्या संकटावर मात करत अमरावतीचे डॉक्टर घेताहेत महिन्याला तब्बल दहा लाख किलो चिकनचे उत्पादन

आतापर्यंत कोरोनाचे १९ हजार ६५९ रुग्ण आढळले असून त्यापैकी १७ हजार २३९ रुग्ण बरे झाले आहे. शहरालगतच्या हिंगणा, नागपूर (ग्रा) व कामठी तालुक्यात मोठा उद्रेक झाला होता. परंतु, आता परिस्थिती आटोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा मोठा लाभ झाला असून त्यातून अनेक रुग्ण आढळून आले. यापुढेही सर्वांनी असेच कार्य करण्याचे आवाहन अध्यक्षांनी केले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recovery rate of rural nagpur is about 90 percent