esakal | लाल मिरची झाली तिखट; निर्यात वाढल्याचा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

Red chillies become red chillies

यंदा तेलंगणामध्ये लाल मिरचीची अडीच कोटी पोती (चाळीस किलोंचे एक पोते), कर्नाटकामध्ये ६० ते ६५ लाख पोती उत्पादन झाल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशात आठ ते दहा लाख पोती उत्पादन झाल्याची माहिती आहे. यामुळे देशात एकूण साडेतीन कोटी पोती मिरचीचे उत्पादन झाले होते.

लाल मिरची झाली तिखट; निर्यात वाढल्याचा परिणाम

sakal_logo
By
राजेश रामपुरकर

नागपूर : परदेशातून वाढलेली मागणी, शीतगृहातील संपत चाललेला साठा या दोन कारणांमुळे मिरचीच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे अचानकच लाल मिरची अधिकच तिखट झालेली आहे.

मार्च आणि एप्रिल या मोसमात दरवर्षी विदेशात मोठ्या प्रमाणात मिरचीची निर्यात होत असते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगात टाळेबंदी होती, तशीच भारतातही होती. चिनमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तेथून लाल मिरचीची मागणी घटली होती. दरम्यान, बांगलादेश, फिलिपाईन्स, श्रीलंका आणि थायलंड या देशात भारतीय मिरचीची मागणी वाढू लागली होती. मात्र, कोरोनामुळे अचानक त्यावर निर्बंध आलेत.

हेही वाचा - सत्तेतील भागीदारानेच केला काँग्रेसचा ‘गेम’; शिवसेनेकडून खिंडार

देशातील टाळेबंदी आता थोडी शिथिल झाल्यानंतर चीन, बांगलादेश, फिलीपाईन्स, इंडोनेशिया या देशात मिरचीची मागणी अचानक वाढली. मात्र, व्यापाऱ्यांकडील शीतगृहातील मिरची संपत आलेली आहे. नवीन मिरची बाजारात येण्यासाठी अजून चार ते पाच महिन्यांचा अवधी आहे. एकूण मिरचीचा उपलब्ध साठा पाहता मिरचीचे भाव तेजीत असल्याचे व्यापारी मिरची व्यापारी संजय वाधवानी यांनी सांगितले.

मिरचीवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येतो. मिरची जीवनावश्यक वस्तू आहे. त्यामुळे मिरचीवर जीएसटी आकारू नये, अशी मागणी मिरची व्यापाऱ्यांची आहे. जीएसटी आकारणीमुळेही किरकोळ बाजारात मिरचीचे भाव वाढले असल्याचे बोलले जात आहे. साधारण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला लाल मिरचीचे भाव कमी असतात.

यंदा तेलंगणामध्ये लाल मिरचीची अडीच कोटी पोती (चाळीस किलोंचे एक पोते), कर्नाटकामध्ये ६० ते ६५ लाख पोती उत्पादन झाल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशात आठ ते दहा लाख पोती उत्पादन झाल्याची माहिती आहे. यामुळे देशात एकूण साडेतीन कोटी पोती मिरचीचे उत्पादन झाले होते.

हेही वाचा - ज्येष्ठांना सोडून कनिष्ठांना ‘ठाणेदारी’?; ज्युनिअर जोमात, सीनिअर कोमात

कमी उत्पादनामुळे दरवाढ

गतवर्षी मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने जुना साठा संपत आलेला होता. दरम्यान, निर्यात बंद झाल्याने देशांतर्गत मागणी वाढली असताना मिरचीचे भाव प्रति किलो ९० तो १२० रुपयापर्यंत कमी झाले होते. आता विदेशात मागणी वाढल्याने खमंग तेज्या मिरची प्रति किलो १२०ते १४० रुपयावरून १६० ते १८५ पोहोचली आहे. तर गुंट्टूर मिरची ८० ते १३० रुपयावरून १२० ते १६५ देवनुर डिलक्स मिरची १०० ते १२० वरून १२० ते १६५ रुपयावर गेली आहे. त्यामुळे मिरचीचे भाव अचानक वाढले आहेत असे वाधवानी म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे