घरी कुणी नसले की जागाचा राक्षस, करायचा अल्पवयीन पुतणीशी संबंध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची तक्रार पीडितेच्या आईकडून पोलिस ठाण्यात करण्यात आली. गुन्ह्यातील आरोपी पसार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

टेकाडी/कन्हान (जि.नागपूर) : नात्याला काळिमा फासणारी घटना कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. बावीस वर्षीय काकाकडून एका अल्पवयीन पंधरा वर्षीय पुतणीवर सप्टेंबर ते डिसेंबर 2019 दरम्यान जिवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करण्यात आले. त्यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची तक्रार पीडितेच्या आईकडून पोलिस ठाण्यात करण्यात आली. गुन्ह्यातील आरोपी पसार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

क्‍लिक करा :  वादळांना शांत करण्याच्या प्रयत्नांचा प्रयोग

नात्याचा गैरफायदा

गुन्ह्यातील आरोपी अतुल (वय22) पंधरा वर्षीय पीडितेच्या वडिलांचा चुलत भाऊ आहे. नात्यात पीडितेचा काका असलेला नराधम अतुल हा पीडितेच्या घराशेजारी राहायचा. नात्यात असल्याने घरच्यांनी कधीच त्याच्यावर संशय केला नाही आणि याच नात्याचा गैरफायदा घेण्याचे काम आरोपीकडून सुरू होते. पीडितेचे आईवडील कामाला बाहेर गेल्यानंतर पीडितेला घरी एकटी गाठून आरोपीने गेल्या सप्टेंबर ते डिसेंबर 2019 पर्यंत धमकी देत पीडितेवर वारंवार अत्याचार केले.

क्‍लिक करा:  तुमच्याही घरावर आहे ना, मुलीच्या नावाची पाटी

प्रकरण शिथिल करण्याचा प्रयत्न

दरम्यान, अल्पवयीन पीडितेच्या पोटात त्रास व्हायला सुरुवात झाल्याने पीडितेच्या आईने 3 फेब्रुवारीला कन्हान येथील तिला खासगी रुग्णालयात तपासण्यासाठी नेले. डॉक्‍टरांनी अल्पवयीन गर्भवती असल्याचे स्पष्ट केल्याने पीडितेचे कुटुंब हादरून उठले. पीडितेला विचारणा केली असता तिने काका अतुल याचे नाव पुढे केले. दरम्यान, कुटुंबातील आरोपी असल्याने आपसात संगनमत करून प्रकरण शिथिल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, 10फेब्रुवारीला पीडितेच्या कुटुंबीयांकडून कन्हान पोलिसात रीतसर आरोपी अतुलविरोधात तक्रार दाखल करून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. कन्हान पोलिसांनी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. बातमी लिहिस्तोवर गुन्ह्यातील आरोपीला अटक झाली नसून तो पसार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relationships with Minor Wives