आता याला काय म्हणावं! मयतीला आले अन् चोरी करून गेले; पाहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल

अनिल कांबळे 
Thursday, 18 February 2021

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर कॉलनी येथे राहणाऱ्‍या जनार्दन बाबुराव चौधरी (६५) यांच्या पत्नी इंदूबाई यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. अंत्यसंस्काराला चौधरी यांचे बरेच नातेवाईक आले होते. काही नातेवाईक त्यांच्याच घरी थांबले होते.

नागपूर ः कुणाच्या घरी अंत्यसंस्कारासाठी पाहुणे आल्यानंतर शोकग्रस्तांना सांत्वन करणे आणि धीर देण्याचे काम नातेवाईकांचे आहे. मात्र, मयतीसाठी आलेल्या पाहुण्यांनी मृताच्या  ३ लाख २० हजारांचे सोन्याचे दागिण्यांवर हात साफ करीत शोकग्रस्तांना आणखी दुःख दिले. घरातील दागिणे चोरणाऱ्या अज्ञात पाहुण्यांविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शांतीनगर कॉलनी येथे घडली.  

लग्नाला दोन वर्ष होताच पती द्यायचा भयंकर त्रास, पत्नीने कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर कॉलनी येथे राहणाऱ्‍या जनार्दन बाबुराव चौधरी (६५) यांच्या पत्नी इंदूबाई यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. अंत्यसंस्काराला चौधरी यांचे बरेच नातेवाईक आले होते. काही नातेवाईक त्यांच्याच घरी थांबले होते.

प्रशासन हादरले! अमरावतीत कोरोना रुग्णांचा उच्चांक, मृत्यूही वाढले

२९ जानेवारी रोजी दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान अंत्यसंस्काराला आलेल्या पाहुण्यांपैकी अज्ञात पाहुण्यांनी चावीने कपाट उघडून त्यात ठेवलेले ३ लाख २० हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?

आता पोलिस मयतीसाठी आलेल्या नातेवाईकांची चौकशी करणार आहेत. त्यामुळे ज्या नातेवाईकांचा या चोरीशी संबंध नाही, त्यांना मनस्ताप सहन करण्याची वेळ येणार आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relatives who came home for funeral theft valuable things in Nagpur