#SundaySpecial मनसोक्‍त खा साखर, कारण असे की...

प्रशांत रॉय
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

भारतात प्रामुख्याने उसापासून साखर तयार करतात. उस शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. शिवाय इतर खर्चही आहे. उसापासून तयार केलेल्या साखरेत रासायनिक घटकांचे अंश असतात. हे घटक मानवी आरोग्यावर हळूहळू कब्जा मिळवितात आणि औषधी घेऊन जीवन व्यतीत करावे लागते. मातीची धूप आणि प्रदूषण यासारख्या पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या बाबी यामुळे वाढतात. 

नागपूर : नागरिकांना आवडेल, पचेल आणि रुचेल असा हमखास उपाय नसल्याने नाइलाजाने साखर खाऊन तोंड गोड करण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु, आता "गोड' पर्याय सापडला आहे. ऍपल (जुने सफरचंद) आणि पीयर्स (नाश्‍पती) या फळांमधून साखरेला समर्थ पर्यायाची निर्मिती शक्‍य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे, ही साखर पर्यावरणपूरक असून, आरोग्यासही उपयुक्त ठरेल, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

साखर उत्पादन आणि निर्यातीमध्ये भारत आघाडीच्या देशांपैकी एक आहे. उस, रताळी यांपासून मुख्यत्वे साखरेची निर्मिती केली जाते. या प्रक्रियेत रासायनिक घटकांचा वापर होतो. साखरेमुळे मानवी शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊन आरोग्याशी संबंधित विविध रोगांना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून सेंद्रिय साखरेचा किंवा मधाचा वापर करावा, असे जाणकार सांगतात. 

अवश्य वाचा - अरेच्च्या! हा बाबा तर निघाला चार बायकांचा दादला, आता पळवली पाचवी

भारतात प्रामुख्याने उसापासून साखर तयार करतात. उस शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. शिवाय इतर खर्चही आहे. उसापासून तयार केलेल्या साखरेत रासायनिक घटकांचे अंश असतात. हे घटक मानवी आरोग्यावर हळूहळू कब्जा मिळवितात आणि औषधी घेऊन जीवन व्यतीत करावे लागते. मातीची धूप आणि प्रदूषण यासारख्या पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या बाबी यामुळे वाढतात. 

रताळ्यापासून मुख्यत्वे परदेशात साखर तयार करतात. भारतात याचे प्रमाण कमी आहे. मधासारख्या नैसर्गिक गोडपणाची अनुभूती देणाऱ्या पदार्थाची स्वतःची गुंतागुंत आहे. स्टिव्हिया रीबौडियाना वनस्पतीपासून स्टीव्हिया हा नैसर्गिक गोडवा असलेला घटक मिळतो. बहुराष्ट्रीय पेयपदार्थ कंपन्यांमध्ये त्याचा वापर करतात. तथापि, या घटकाच्या पेयाला काहीशी कडू चव येते. यामुळे पेयकंपन्या आपल्या पेयात कृत्रिम साखरेचाही वापर करतात. 

फर्मन्टेशनने मिळवले फ्रुक्‍टोज

एका डच कंपनीने सफरचंद आणि नाश्‍पतीच्या उरलेल्या फळांच्या तुकड्यांसह मॉल, सुपरमार्केटसाठी अयोग्य असलेले, आंबवलेले, स्थानिक शेतकऱ्यांकडून कुजके झाल्यानंतर फेकून देण्यात येणाऱ्या या फळांपासून कॅलरी फ्री स्वीटनर तयार केले आहे. फर्मन्टेशन प्रोसेसद्वारे फ्रुक्‍टोज मिळविण्यात त्यांनी यश मिळविले असून, फळांच्या कचऱ्यातून याची निर्मिती केली आहे. यामुळे भविष्यात साखरेला समर्थ आणि आरोग्यास सुयोग्य असा पर्याय मिळण्याचा मार्ग खुला झाल्याचे डच संशोधकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - लाखनीत झाला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपी व्हॅनटालकास अटक

स्वीटनर शोषले जात नाही

जागतिक पातळीवर सध्या साखर ही आरोग्य आणि पर्यावरणास धोका मानली जात आहे. कृत्रिम स्वीटनर असलेले सुक्रॉलोज आणि अस्पार्टम आपल्या शरीरात शोषले जात नाहीत. हे स्वीटनर्स थेट नदी व समुद्रामध्ये पोहोचून जलचर वनस्पती आणि प्राण्यांच्या जीवनासही हानी पोहोचवतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. या परिस्थितीत साखरेला पर्याय म्हणून नैसर्गिक गोडवा आणि रासायनिक अंश नसलेला पदार्थ तयार करणे आमच्यासमोर आव्हान होते. कुजलेल्या फळांपासून आम्ही नैसर्गिक गोडव्याची निर्मिती केली आहे. लवकरच यावर सखोल संशोधन करून जगाला गोड बातमी देऊ, असे डच संशोधकांनी स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roasted apples, natural sugar from pears