
नागपूरच्या जरीपटका भागात रॉयल बारमध्ये अज्ञात आरोपींनी लुटमार केली. फक्त लुटमारच नाही तर आरोपी तरुणांनी चक्क तलवारीचा धाक दाखवत बार लुटला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
नागपूर : नागपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रत्येक दिवशी चोरी, मारामारी, लूट आणि खुनाच्या घटना समोर येत आहेत. तयामुळे गुन्हेगारांची हिंमत चांगलीच वाढली आहे. शहरातील जरीपटका भागातील एका बारमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
नागपूरच्या जरीपटका भागात रॉयल बारमध्ये अज्ञात आरोपींनी लुटमार केली. फक्त लुटमारच नाही तर आरोपी तरुणांनी चक्क तलवारीचा धाक दाखवत बार लुटला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
कोरोना संक्रमणाची भीती वाटतेय? अशा करा भाज्या स्वच्छ!
आरोपी तरुण तलावारीचा आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत बार लुटताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बारमधील लोकांनी मोठी तारांबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी सगळेजण धावपळ करताना दिसत आहेत.
रॉयल बारमध्ये आरोपी घुसले आणि तलवार आणि अन्य शस्त्राच्या धाकावर काउंटरवर जाऊन पैशांची लुट केली. रोकड आणि दारूच्या बाटल्या घेऊन फरार झाले. ही संपूर्ण घटना बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींनी पळ काढताच बार मालकाने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. .
कडकनाथ कोंबडी खाल्ली का? होमिओपॅथी आणि मानसिक विकारासाठी होतोय वापर!
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि सीसीटीव्हीच्या आधारे संपूर्ण आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.